Salman Rushdie : ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला

Salman Rushdie : सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते लखक आहेत. त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत.
salman rushdie
salman rushdiesarkarnama
Published on
Updated on

न्यूयॉर्क :प्रसिद्ध कादंबरीकार सलमान रश्दी (salman rushdie) यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशन येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. (Salman Rushdie latest news)

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांपैकी एकाने हा व्हिडिओ चित्रीत केला आहे. यामध्ये घटनेनंतर उडालेला गदारोळ दिसून येतो.

बुकर पुरस्कार विजेते लेखक सलमान रश्दी हे न्यूयॉर्कमधील शिटाक्वा इन्स्टिट्यूशन येथील एका कार्यक्रमात बोलत होते. रश्दी हे बोलत असताना हल्लेखोर अचानक त्यांच्या दिशेने धावत गेला. त्याने रश्दी यांना जोराने ठोसा मारला, असं तेथील उपस्थितांनी सांगितले.

salman rushdie
Supreme Court : निवडणुका EVM वर की, बॅलेट पेपरवर ? ; न्यायालयानं स्पष्टचं सांगितलं..

'द सॅटेनिक व्हर्सेस' पुस्तकानंतर रश्दींना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. सलमान रश्दी हे बुकर पुरस्कार विजेते लेखक आहेत. त्यांच्या लिखानामुळे अनेकदा वादातही राहिले आहेत.

असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टरनुसार चौटाका इन्स्टिट्यूटच्या स्टेजवर एका व्यक्तीने रश्दी यांच्यावर तुफान हल्ला केला. रश्दींची ओळख करून देत असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यानंतर रश्दी हे जमीनीवर कोसळले.

सलमान रश्दींचं 'द सॅटेनिक व्हर्सेस' पुस्तक 1988 मध्ये प्रकाशित झालं आहे. हे त्यांचे चौथं पुस्तकं आहे. काही देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली.या पुस्तकामुळे रश्दींना जवळपास 9 वर्षे अज्ञातवासात राहावं लागलं होतं.

या पुस्तकातील मजकुरावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. मुस्लीमबहुल देशांमध्ये या पुस्तकामुळे सलमान रश्दींविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com