पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडून चंद्रकांतदादांकडे येणार !

पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी तीन-चार महिने काम केले आहे.
Chandrakant Patil-Ajit Pawar
Chandrakant Patil-Ajit PawarSarkarnama

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे काही प्रमुख नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाटील मंत्रीपदी शपथ घेणार असल्याने पुण्याचे पालकमंत्रीपददेखील त्यांच्याकडेच जाणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

Chandrakant Patil-Ajit Pawar
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेच १ जुलै रोजी शपथ घेणार

फडणीस सरकारच्या आधीच्या पाच वर्षाच्या काळातील सुमारे चार वर्षे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रीपद होते. बापट खासदार झाल्यानंतर ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आली. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पाटील पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले.

Chandrakant Patil-Ajit Pawar
दीपक केसरकरांनी फोडले संजय राऊतांच्या डोक्यावर खापर : काँग्रेस व राष्ट्रवादीवरही आरोप

प्रदेशाध्यक्ष असले तरी आमदार या नात्याने पाटील यांचा पुण्यात वावर होता. त्यामुळे पुण्यातील राजकारणात पाटील यांचाच शब्द अंतीम मानला जाऊ लागला. राज्यात आता सत्ताबदल होत आहे. त्यामुळे पुण्यातून मंत्री कोण होणार आणि पालकमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली. या चर्चेचा कानोसा घेतला असता पुण्याचे पालमंत्रीपद पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता पाच वर्षे राहिली. त्यानंतर आता होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील होती.मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता होती. त्यामुळे भाजपाला अडचणींचा सामना करावा लागत होता. दुसरीकडे महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पिंपरी-चिंचवड व पुण्यात राष्ट्रवादीने सत्ता काबीज करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केली होती. मात्र, आता पुन्हा फडणवीस यांचे सरकार सत्तेत येत असल्याने पुणे-पिंपरीसह राज्यातील विविध महाापालिकांमध्ये सत्तेत येणे भाजपाला सोयीचे होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com