Eknath Shinde : शिवसेना मिळाल्यानंतर शिंदे ॲक्शन मोडवर; बोलवली तातडीची बैठक; आखणार मास्टर प्लान?

Shivsena News : शिंदे गटाच्या हालचाली वाढल्या...
Shivsena Shinde
Shivsena Shinde Sarkarnama

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले. तर शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची उद्या (दि.20 फेब्रुवारी) महत्वाची बैठक बोलावली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्या सकाळी 10 वाजता मुंबईत शिंदे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत आता शिंदे गटाची पुढील रणनीती ठरण्याची शक्यता आहे.

Shivsena Shinde
Dombivali News : धनुष्यबाण मिळताच शिंदे समर्थकांची बॅनरबाजी : 'विजय विचारांच्या वारशाचा..'

तसेच सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. यामध्ये 21 ते 23 फेब्रुवारीपर्यंत घटनापीठ सुनावणी घेणार आहे. त्यामुळे शिंदे गटाची पुढील लढाई ही सुप्रीम कोर्टात असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाच्याही हालचाली वाढल्या आहेत.

Shivsena Shinde
Chinchwad By-Election : जिची बहिण वाघीण, तिला भिण्याची गरज नाही; पंकजा मुंडेंची चिंचवडमध्ये डरकाळी!

त्यामुळे उद्या (दि.20 फेब्रुवारी) शिंदे गटाच्या आमदारांची महत्वाची बैठक मुंबईत पार पडणार असल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता पुढचा मास्टर प्लान काय आखणार? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Shivsena Shinde
Supreme Court : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट : सर्वोच्च न्यायालयात २१ पासून सलग सुनावणी होणार...

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) मुख्य प्रकरणावर आता सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटामध्ये देखील हालचालींना वेग आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com