Supreme Court hearing : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता या आठवड्यातही सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) मुख्य प्रकरणावर आता सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यायालयामध्ये आमदारांची अपात्रता, राज्यपालाचे अधिकार, विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव, व्हिप कोणाचा ग्राह्य धरायचा, अशा अनेक याचिका प्रलंबीत आहेत. त्यावर आता न्यायालयात सुनावणी होणार आहे. आतापर्यंत न्यायालयात केंद्रीय निवडणूक आयोग आणि नबाम रेबिया केस आणि सात न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवायचे की नाही, यावर सुनावणी झाली.
मागील सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट केले होते की हे प्रकरण सध्या तरी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार नाही. या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोरच होणार आहे. त्यामुळे आता 21, 22 आणि 23 तारखेला घटनापीठ सुनावणी करणार आहे. मागच्या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर याही आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना हा मुळ पक्ष आणि धणुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. आयोगाच्या निर्णया विरोधातही शिवसेना (Shivsena) सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे याच तीन दिवसांमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर जवळपास मागील आठ महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. सुरुवातील या प्रकरणाची सुनावणी सुट्टीकालीन न्यायालयासमोर झाली. त्यानंतर तीन न्यायमूर्तींच्या समोर सुनावणी झाली. त्यांनी हे प्रकरण पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवले. या खंडपीठासमोर निवडणूक आयोगासंदर्भात आणि रेबीया केस संदर्भात सुनावणी झाली. आता न्यायालयात मुख्य प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा मिळतो का? याकडेही राज्याचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.