Shivsena Prepare for Loksabha : शिवसेनेकडून लोकसभेची तयारी सुरू; राहुल शेवाळेंनी आकडाच सांगितला

Loksabha Election and Mahayuti : महायुतीत जागांबाबत मुख्यमंत्री शिंदे आणि भाजप केंद्रीय नेते निर्णय घेतील
Rahul Shewale
Rahul ShewaleSarkarnama

Loksabha Election and Shivsena : आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांबाबत भाजप, शिवसेना, रिपाइं व इतर पक्षांच्या महायुतीत कुठल्याही प्रकारचे वाद नाहीत. महायुती राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करीत खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना किती जागांवर लढणार, असल्याचे स्पष्टच सांगितले.

राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना लोकसभेसाठी महायुतीच्या रणनीतीबाबत माहिती दिली. शेवाळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. शेवाळे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातून भाजपविरोधक एकत्र येत आहेत. राज्यातही महाविकास आघाडी आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यासह काही नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आधी विरोधकांची एकी होऊद्या, त्यांना एकत्र त्यांचे महागठबंधन होऊद्या. त्यानंतर विरोधकांचा चेहरा ठरेल. सध्या तरी त्यांच्यात कसरत सुरू आहे."

Rahul Shewale
New Parliament Building : ''संसद भवन भाजप-संघाचं कार्यालय नाही, मी... !''; माजी पंतप्रधानांनी ठणकावलं

लोकसभेच्या २२ जागांवर शिवसेना (Shivsena) लढण्याची तयारी करीत असल्याचेही शेवाळे यांनी यावेळी माहिती दिली. शेवाळे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या १३ खासदारांची बैठक घेतली. त्यात लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. दरम्यान, २०१९ मध्ये महायुतीत शिवसेनेने २२ जागा लढल्या होत्या. त्या ठिकाणी तयारी करण्याची तयारी करण्याची चर्चा बैठकीत झाली आहे."

महायुती लोकसभेसाठी दौरे करणार असल्याचे शेवाळे यांनी सांगिले. ते म्हणाले, "सध्याचे १३ खासदार व इतर जागांसह पराभूत झालेल्या ठिकाणाही शिवसेना लढण्याची तयारी करत आहे. त्याबाबत दोन महिन्यात मुख्यमंत्री शिंदे दौरा करणार आहेत. लोकसभानिहाय महायुतीचे मेळावे होतील. तेथील विकासकामांवर भर देणार आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीतून दौरे केले जातील."

Rahul Shewale
Congress News : कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस लागली लोकसभेच्या तयारीला; येत्या २ व ३ जूनला मतदारसंघनिहाय बैठका

महायुतीत जागावाटपांवरून एकवाक्यता नाही. शिवसेना-भाजप (Mahayuti) निवडून येण्याच्या दृष्टीने जागांवाटपाबाबत चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यावर शेवाळे म्हणाले, "अद्याप तरी जागावाटपांबाबत महायुतीत काही चर्चा झालेली नाही. शिवसेनेत २२ जागांवर तयारी करण्याची चर्चा झालेली आहे. इतर जागांबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजचे केंद्रीय नेते निर्णय घेतील. आता लोकसभा निवडणुकीला कमी कालावधी उरलेला आहे. त्यामुळे ऐनवेळी कुठे कमी पडू नये, यासाठी शिवसेना पूर्व तयारी करीत आहे. बाकी महायुतीत कुठेही जागावाटपांबाबत वाद नाही. त्याबाबत मुख्यमंत्री आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com