जयंत पाटलांनी सांगितले नगरपंचायत निवडणूकीतील पराभवाचे कारण

राष्ट्रवादी पक्षात रोज लोक येत आहेत आणि येतच राहणार.
Jayant Patil
Jayant Patil
Published on
Updated on

सांगली: सांगलीच्या (Sangali) कडेगावमध्ये मंत्री विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांना नगरपंचायत निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. पण काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) समजूतदारपणा दाखवला असता तर भाजपला यश मिळाले नसते. पुढच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समजूतदारपणाने काम करेल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होतो. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही अधिक प्रबळ व्हावी हाच सर्वांचा आशावाद आहे. भारतीय जनता नेहमी लोकशाहीवादी राहिले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी पक्षात रोज लोक येत आहेत आणि येतच राहणार. दर गुरुवारी मुंबईमध्ये पक्षात नवीन अनेक लोक येत आहेत. त्यामुळे पक्ष आणखी वाढणार आणि बळकट होणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Jayant Patil
बार्शीत राष्ट्रवादी टाकणार मोठा डाव! बारबोले अन् जयंत पाटलांची झाली भेट

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही भाष्य केलं. सांगली जिल्ह्यात कोरोनाची जय्यत तयारी आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंटचे प्रमाण कमी आहे. घरातच नागरीक औषध उपचार करत लढत आहेत. सध्या तरी आरोग्य यंत्रणेवर ताण नाही. ही लाट सर्वांच्या परिश्रमांमधून ओसरेल, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात दावा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, नबाव मलिक असा दावा केला आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या सांगलीत लवकरच भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह आहे.

राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत जाण्यासाठी तयारी केली आहे. या दोन्ही नेत्यांबद्दल राष्ट्रवादीनेही कमालीची गुप्तता बाळगल्याचे दिसून येत आहे. लवकरच हे दोन्ही नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील आणि शिराळयाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चार पैकी 2 आमदारांची राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com