Dasara Melava : ठाकरेंनी स्क्रिप्ट राईटर बदलावा ; फडणवीसांनी उडवली ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली

Dasara Melava : ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा शिंदेंच्या मेळाव्याला दुपट्ट गर्दी होती," असे फडणवीस म्हणाले.
Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray|Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

पुणे : इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे काल (बुधवारी) दोन मेळावे (Dasara Melava) झाले. बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला. दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांवर सडकून टीका केली. या भाषणावर भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. फडणवीस पुण्यात माध्यमांशी बोलत होते. (shiv sena Dasara Melava news update)

ठाकरेंच्या भाषणांबाबत पत्रकारांनी विचारले असता फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचे भाषण नेहमीप्रमाणे तेच-ते होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही मुख्यमंत्र्याचे भाषण केले नाही, ते पक्षप्रमुख म्हणूनच भाषण करीत होते. आम्हाला त्याचा कंटाळा आला आहे. त्यांनी आता आपला स्क्रिप्ट राईटर बदलावा,"

"खरी शिवसेना कुणाची हे एकनाथ शिंदेंनी कालच्या मेळाव्यातून दाखवून दिले. ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा शिंदेंच्या मेळाव्याला दुपट्ट गर्दी होती," असे फडणवीस म्हणाले. "येत्या महापालिका निवडणुकीत शिंदेंचाच भगवा फडकणार," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच दसरा मेळाव्याला बुधवारी बीकेसी मैदानात विक्रमी दीड लाखाची गर्दी जमवण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे. आपल्या जवळपास दीड तासाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी गद्दारी आणि खोके या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackeray|Devendra Fadanvis
Uddhav Thackeray : आम्हाला हिंदुत्व शिकवणार का ? ; ठाकरेंनी मोदी, अडवाणींनाही सुनावले

"आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांना (उद्धव ठाकरे) मी पहिल्यांदाच भेटलो. मला वाटले ते आता ठाण्यातील पक्ष, नेते आदींबाबत विचारतील. मात्र, त्यांनी दिघेंची प्रॉपर्टी किती आहे, कुठे आहे, कुणाच्या नावावर आहे, अशी विचारणा केली, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी गुजरातला गेल्याच्या वादावरही त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. तुमच्या टक्केवारीमुळे ही कंपनी गुजरातला गेली. कंपनी मालकाला सरकार बदलणार याची माहिती नव्हती,"असे मुख्यमंत्री म्हणाले.

शिंदे म्हणाले, "दोन महिन्यांपासून आम्हाला खोके-खोके, गद्दार म्हटले जात आहे. होय गद्दारी झाली, पण २०१९ मध्ये. तेव्हा ज्या निवडणुका झाल्या त्यानंतरची आघाडी हीच खरी गद्दारी होती. ती बाळासाहेबांचे विचार आणि जनतेशी गद्दारी होती. आम्ही गद्दार नाही, गदर आहोत. गदर म्हणजे क्रांती. तुम्हाला ४० आमदार, १२ खासदार, १४ राज्यांतील प्रमुख आणि लाखो शिवसैनिकांनी का सोडलं? याचं तुम्ही गद्दार-गद्दार म्हणून टाहो फोडण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com