Uddhav Thackeray : आम्हाला हिंदुत्व शिकवणार का ? ; ठाकरेंनी मोदी, अडवाणींनाही सुनावले

Uddhav Thackeray : माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल तर आम्ही कदापी शांत बसणार नाही.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "राष्ट्रवादी कॉंगेस, कॉंग्रेससोबत युती करुन शिवसेनेनं हिंदुत्व सोडले," असा आरोप शिंदे गटातील नेते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर करीत असतात. त्याला काल (बुधवारी) झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले.

“शिवसेनेने आपले हिंदुत्त्व सोडलेले नाही.सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही. आम्ही आजही हिंदुत्त्ववादीच आहोत,” अशी भावना उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केली. "आम्हाला हिंदुत्व शिकवू नका," असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे गट आणि भाजप नेत्यांना दिला.

"जर माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल तर आम्ही कदापी शांत बसणार नाही. आज इकडे जिवंत मेळावा आहे. तिकडे नुसता रडारड सुरू आहे, ग्लिसरिनच्या बाटल्या गेल्यात," असा टोला त्यांनी हाणला.

आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?

"आम्ही भारतीय जनता पक्षाची साथ सोडली म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. पाकिस्तानच्या जीनाच्या कबरीवर यांच्या नेत्यांनी मस्तकं टेकवली. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला न बोलवता गेले आणि केक खाल्ला, हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार का?" असे त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Prataprao Jadhav : शिंदे गटातील खासदारावर मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी

"शिवसेनेतून गद्दारींनी केली, मंत्रीपद काही वेळेपुरतंच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता तो 50 खोक्यांचा बकासूर झाला आहे," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

लालकृष्ण अडवाणी अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर येत होते. त्या दोघांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. शिवसेना आणि अडवाणी, शिवसेना आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com