Eknath Shinde: फडणवीसांना मागे टाकत शिंदेंनी तोडले रेकॉर्ड! शिवसेनेकडून एकाच घरातील 6 जणांना उमेदवारी

Shivsena six Candidates Same Family in Badlapur: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकात कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्ष पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केवळ प्रचारच करायचा का? त्यांना उमेदवारीची संधी कधी मिळणार? असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.
Shivsena six Candidates Same Family in Badlapur
Shivsena six Candidates Same Family in BadlapurSarkarnama
Published on
Updated on

घराणेशाहीत भाजपसोबत आता शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकत नवे रेक्रार्ड स्थापन केले आहे. सध्या सुरु असलेल्या नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी कुटुंबातील दोन-तीन व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे दिसते. पण शिवसेनेने बदलापूरमध्ये सहा जणांना उमेदवारी देऊन घराणेशाहीला खतपाणी घातले असल्याचे दिसते.

निवडणूक आणि नात्या गोत्याचं राजकारण महाराष्ट्राला तसं नाही,कुठे पती-पत्नी तर कुठे पिता-पुत्र, कुठे दीर-भावजय तर कुठे भाऊ-भाऊ असं चित्र पाहायला मिळतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपकडून आतापर्यंत काँग्रेसमधील गांधी कुटुंबाच्या घराणेशाहीवर अनेकदा टीका करण्यात आली आहे.

आता महायुतीतील शिवसेनेने एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकीट दिल्याने काँग्रेससोबत भाजप नेत्यांच्या रडारवर शिवसेना आहे. आता एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

कुळगांव बदलापूर नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एकात कुटुंबातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अनेक वर्ष पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केवळ प्रचारच करायचा का? त्यांना उमेदवारीची संधी कधी मिळणार? असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.

Shivsena six Candidates Same Family in Badlapur
Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांचा नवा राजकीय डाव : अजितदादांचा माजी आमदार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी

शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्या घरातील सहा जणांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. वामन म्हात्रे यांच्यासह त्यांची पत्नी, भाऊ, मुलगा, भावजई, भाचा अशा एकूण एकाच घरातील 6 जणांना शिवसेनेचे तिकीट मिळाले आहे. वामन म्हात्रे यांच्या घरातील 4 जणांना 2015 मध्ये झालेल्या महापालिकेची निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती.

भाजपकडून लोह्यामध्ये सहा जणांना उमेदवारी

मराठवाड्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणूकीत भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे.नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नगरसेवक पदासाठी गजानन यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना तिकीट दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com