Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
Shivsena Leader Aditya Thackeray Latest NewsSarkarnama

राज्यात सध्या सर्कस सुरु झाली मात्र गद्दार हा गद्दारच असतो : आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray|Shivsena : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे.
Published on

Aditya Thackeray : राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर आता दिल्लीतही पक्षाला मोठा धक्का दिला आहे. सेनेच्या १२ खासदारांनी वेगळी भूमिका घेत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंनी आज १२ खासदारांसह आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी राज्यात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका घेतली. तिच भूमिका खासदार घेत असल्याचे सांगितले आणि घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. यानंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदार आणि खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ते आज मुंबई, कुर्ला येथील नेहरूनगर येथे निष्ठा यात्रेत बोलत होते.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
होय,आम्हीच व्हिलन कारण गद्दारांवर अंधविश्वास टाकला...

आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात सध्या सर्कस सुरु झालं आहे मात्र हा गद्दार हा गद्दारच असतो. उद्यापासून न्यायालयात एक महत्त्वाची केस सुरू होत असून ही केस नुसती शिवसेनेसाठी महत्त्वाची नाही, तर देशासाठी महत्त्वाची राहील. कारण या देशात लोकशाही आहे की नाही? किंवा टिकणार की नाही ? याच्यावर उद्या निकाल दिला जाईल, असे आदित्य म्हणाले.

Shivsena Leader Aditya Thackeray Latest News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

आदित्य म्हणाले, महाराष्ट्र दौरा सुरू केला असून आज मी इथे लोकांना भेटतोय तसेच मी सगळ्या लोकांना भेटायला जाणार आहे. कुठे कोणावर आरोप प्रत्यारोप राजकीय टीका टिप्पणी करायला जायचे नसून लोकांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जायचं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीचे अधिकार हे पक्षप्रमुखांकडे आहेत. पण ही सध्या सर्कस सुरू झालेली आहे. स्वतःच्या मनाला पटवून देण्यासाठी की आम्ही जे करतो ते बरोबर आहे. यासाठी हे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गद्दारीचा शिक्का यांच्यावर लागलेला असून लोकांसमोर जगजाहीर झाले आहे. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले आहेत. तसेच राजीनामा देण्याची हिंमत असेल तर यांनी द्यावा आणि पुन्हा निवडून या, असे आव्हानही आदित्य यांनी यावेळी बंडखोरांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com