Video Sanjay Raut : "पक्ष पळवणाऱ्यांना मर्दानगीची भाषा शोभत नाही..."; अजितदादांच्या आव्हानाला राऊतांचं रोखठोक प्रत्युत्तर

Sanjay Raut Vs Ajit Pawar : "रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये."
Sanjay Raut Vs Ajit Pawar
Sanjay Raut Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 Sep 2024 : मालवण (Malvan) येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रविवारी मुंबईत महायुती सरकारविरोधात जोडे मारा आंदोलन केलं.

या आंदोलना दरम्यान, आघाडीतील प्रमुख नेते, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, फोटोला जोडे मारल्याच्या घटनेवरून बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, एकनाथराव शिंदे (Eknath Shinde) , देवेंद्रजी आणि मी आमच्या फोटोवर चप्पल घेतली आणि चपलेने मारलं, हिंमत असेल तर समोर या. रडीचा डाव कसला खेळताय, असे फोटोला कशाला जोडे मारताय धमक असेल तर समोर याना", अशा शब्दात त्यांनी आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिलं होतं.

Sanjay Raut Vs Ajit Pawar
Shivsena News : शिंदेंच्या कार्यकर्त्याला ठाकरे गटात घेण्यास पदाधिकार्‍यांचा विरोध, पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे केली मोठी मागणी

तर आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) याच वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांन जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पक्ष चोरणाऱ्यांच्या तोंडात मर्दानगीची भाषा शोभत नाही, असं म्हणत राऊतांनी अजित पवारांवर बोचरी टीका केली.

राऊत म्हणाले, "रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये. त्यांच्यात कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात.

Sanjay Raut Vs Ajit Pawar
Keshav Upadhyay : गांधी, पवार, ठाकरेंचे संधीसाधू राजकारण; केशव उपाध्ये यांचा प्रहार

जे चोरी करुन राजकारणात आले आहेत मग ते मिंधे असतील किंवा अजितदादा त्यांच्या तोंडात अशी मर्दानगीची भाषा शोभत नाही." असं म्हणत राऊतांनी अजितदादांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com