Shivsena News : शिंदेंच्या कार्यकर्त्याला ठाकरे गटात घेण्यास पदाधिकार्‍यांचा विरोध, पत्राद्वारे उद्धव ठाकरेंकडे केली मोठी मागणी

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते साईनाथ तारे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज त्यांचा मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवास्थानी पक्ष प्रवेश केला जाणार आहे.
Eknath Shinde, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 03 September : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थानिक नेते पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या ज्या पक्षात आहेत तिथे आपल्यावर अन्याय होत असल्याचे कारण देत, तसेच विधानसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने हे नेते पदाधिकारी पक्ष बदलत आहेत.

अशातच आता एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचे कार्यकर्ते साईनाथ तारे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज त्यांचा मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवास्थानी पक्ष प्रवेश केला जाणार आहे. मात्र, तारे यांच्या पक्ष प्रवेशाला ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

शिंदे गटातील पदाधिकार्‍याचा पक्ष प्रवेश झाल्यास अडीच वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावतील, त्यामुळे यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी करणारं एक पत्र ठाकरे गटातील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर (Alpesh Bhoir) यांनी उद्धव ठाकरेंना पाठवले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
MVA Seat Sharing: जागा वाटपावरून मविआचं घोडं अडलं? निवडणुकीच्या तोंडावर गुंता वाढला...

लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. कल्याण (Kalyan) पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटात अनेक जण इच्छूक आहेत. अशातच कल्याणधील शिवसेना नगरसेविकेचे पती साईनाथ तारे (Sainath Tare) यांचा मातोश्री या निवास्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थिती पक्ष प्रवेश होणार आहे.

या पक्ष प्रवेशापूर्वीच ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली या बैठकीत, साईनाथ तारे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करण्यात आल्याचा ठराव करण्यात आला. तर युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी या संबंधित उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवलं. या पत्रात लिहिलं आहे की, "साईनाथ तारेंवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

Eknath Shinde, Uddhav Thackeray
Unmesh Patil : गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाचे थेट आव्हान!

लोकसभा निवडणूकीत त्यांनी आपल्या पक्षाचे बूथ लावू दिले नाहीत. अशा व्यक्तिला पक्षात घेतल्यास निष्ठावंतावर अन्याय होईल. त्यामुळे अशा व्यक्तीला पक्षात घेतले तरी देखील एक वर्ष त्याला कोणतेही पद दिले जाऊ नये. तसेच निवडणूकीत उमेदारीचा विचार होऊ नये."

त्यामुळे, उद्धव ठाकरे आता या पत्रावर आणि पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या संबंधित साईनाथ तारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी काही लोक नाराज असतील त्यांच्यासोबत चर्चा करुन त्यांचा गैरसमज दूर करणार असल्याचं सांगितलं. शिवाय मी शिंदे गटात होतो. आता माझा पक्ष प्रवेश ठाकरे गटात होणार असून याबाबतची प्रतिक्रिया कल्याणमध्ये येऊन देईन असं त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com