Narayan Rane: शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा: नारायण राणेंनी जखमेवर मीठ चोळलं

Maharashtra Political crises| Narayan Ran| एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून बहुमत सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले आहे.
Narayan Rane News in Marathi, Maharashtra Political crisis
Narayan Rane News in Marathi, Maharashtra Political crisis

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याच दावा केला आहे. या याचिकेत 38 शिवसेना आमदारांनी व अपक्ष आमदार असे 51 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा काढून घेतल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी आव्हान दिले आहे. (Narayan Rane News in Marathi)

राज्यातील या घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. ''शिवसेनेची सत्ता गेल्यात जमा. युवराजांनी धमक्या देणं बंद करावं. अंगावरचे मच्छर मारता येत नाहीत अशांच्या, 'गुवाहाटीतील हॉटेलमधून बंडखोरांची प्रेतं बाहेर पडतील', अशा वल्गनांवर कोण विश्वास ठेवेल? अशा धमक्या देणं हा गुन्हा होत नाही का?'' असे ट्विट करत नारायण राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Maharashtra Political crisis news)

Narayan Rane News in Marathi, Maharashtra Political crisis
शिवसेनेवर संकटांचा डोंगर; संजय राऊतांना ईडीचं बोलावणं

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर संकटाचे ढग घोंगावत असताना दूसरीकडे खासदार संजय राऊत यांनाही ईडीची नोटीस पाठवण्यात आली असून त्यांना उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आमदारांच्या बंडाने मोठं संकट कोसळलेल्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खासदार संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना मंगळवारी (ता. 28) चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं समजतं. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. बंडखोर आमदारांवर होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. तसेच अजय चौधरींच्या गटनेते पदाला शिंदे गटाचा आक्षेप असल्याची याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा उपाध्यक्षांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष कार्यालयाचा दुरुपयोग राज्य सरकारने सुरू केला असल्याचे बंडखोर आमदारांनी याचिकेत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com