Ravindra Waikar News: रवींद्र वायकरांची आर्थिक गुन्हे शाखेकडून सहा तास चौकशी; बाहेर येताच दिली 'ही' प्रतिक्रिया

ShivSena MLA Ravindra Waikar : आमदार रवींद्र वायकर यांना 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते.
Ravindra Waikar
Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते, आमदार रवींद्र वायकर यांना 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले होते. तसेच 23 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते, त्यानुसार वायकर सोमवारी चौकशीसाठी हजर राहिले असता त्यांची तब्बल सहा तास आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्या विरोधात 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर जोगेश्वरी येथील हॉटेल प्रकरणी वायकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.

Ravindra Waikar
Babandada Shinde Viral Lettar : सोशल मीडियातील व्हायरल पत्रावरून आमदार बबनराव शिंदेंवर मराठा समाजाचा हल्लाबोल्ल

त्यानंतर रवींद्र वायकर यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. मात्र, या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेत रवींद्र वायकर यांना चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. या समन्स नंतर वायकर सोमवारी चौकशीला हजर राहिले, त्यांची तब्बल सहा तास आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली.

दरम्यान, चौकशीनंतर आमदार रविंद्र वायकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर यांनी मांध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया देत "आपल्यावर राजकीय हेतूने आरोप करण्यात आले असून माझा विजय सुप्रिम कोर्टात होईल", असे ते म्हणाले.

Edited by Ganesh Thombare

Ravindra Waikar
NCP VS BJP Twitter War: शरद पवार-चंद्रशेखर बावनकुळेंवरील टीकेवरून राष्ट्रवादी अन् भाजपात ट्विटर वॉर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com