Shrikant Shinde : राहुल गांधी चीनचे प्रवक्ते, तर अखिलेश यादवांना महाकुंभावरून सुनावले; खासदार शिंदेंनी संसद गाजवली

ShivSena MP Thane district Shrikant Shinde Congress Rahul Gandhi SP Akhilesh Yadav Budget 2025 : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत बजेटवर भाषण करताना राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या भूमिकेवर टोलेबाजी केली.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशात कुठच्या निवडणुका असो किंवा नसो, तरीही काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी सत्ताधीशांच्या रडारवर असतात. निवडणुकीत प्रचारातील राहुल गांधींची स्टाईल, परदेशातील भाषणे, सावरकरांवरची विधाने, हिंदुत्वाबाबतची भूमिकेवरून सत्ताधीश मंडळी राहुल गांधींना घेरतात.

लोकसभेच्या या अधिवेशनातही राहुल गांधींना चौहू बाजुंनी कोंडीची एकही संधी सत्ताधारी बाकींवर कोणी सोडताना दिसली नाही. त्यात शिवसेनेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या धारदार आणि तितक्याच मिश्किल भाषण शैलीत बजेटवरच्या भाषणात राहुल गांधींना थेट चीनचे प्रवक्ते असल्याचे सभागृहात जाहीर करून टाकले.

डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi)दिलेल्या उपाधीमुळे सभागृहात हशा पिकला. राहुल गांधींसह श्रीकांत शिंदे यांनी कुंभमेळाव्याच्या मुद्यावरून समाजवादी पक्षाचे नेते खासदार अखिलेश यादव यांनाही चिमट्यांवर चिमटे काढले. लोकसभेतील 23 मिनिटांच्या भाषणात, श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना शब्दाने गारद करून, आपले भाषण गाजवले.

Shrikant Shinde
Jagdeep Dhankhar : सीबीआय संचालक अन् निवडणूक आयुक्तांच्या निवडीत सरन्यायाधीश कशाला हवेत? उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रश्नाचे पडसाद

अखिलेश यादव यांनी महाकुंभच्या नियोजनावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी हल्ला चढवला. "देशभरातल्या हिंदूंच्या आत्मसन्मानाला आपण ठेच पोचवली आहे. या महाकुंभमध्ये आतापर्यंत कोटी लोकांनी स्नान केले. असे असताना, आपण हिंदू (Hindu)अन् महाकुंभाच्या विरोधात आपण विधानं केली आहे. त्यामुळे तुम्हाला आता महाकुंभमध्ये स्नान करावेच लागेल, डुबकी लगानी पडेगी. काही जणांनी घाबरून डुबकी घेतली आहे.हिंदूच्या विरोधातच विरोधकांनी भूमिका घेतल्याने देशातील जनता एकत्र येऊ लागली आहे", असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

Shrikant Shinde
ShivsenaUBT Politics : उद्धव ठाकरे 'ऑपरेशन टायगर'विरुद्ध अ‍ॅक्शन मोडवर; पक्षविरोधात कारवायांवरून तिघांची हकालपट्टी

राहुल गांधींनी माफी मागावी

लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी बजेटवर केलेल्या भाषणावर खासदार शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "राहुल गांधी चीनचे प्रवक्त अधिक वाटत होते. चीनची अर्थव्यवस्थेचे कौतुक करताना, मेक इन इंडियाला नाव ठेवणे म्हणजे, सरकार नव्हे, तर देशातील मजूर, शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ, डाॅक्टरांना नाव ठेवण्यासारखे झाले आहे". राहुल गांधी यांनी यावर माफी मागावी, अशीही मागणी खासदार शिंदे यांनी केली.

मोदी अन् सीतारामन यांचे कौतुक

बजेटवर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी निर्मला सीतारामन यांचे कौतुक केले. टीम इंडियाचे कप्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले, तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टीम इंडियाचा आॅल राऊंडर म्हटले जाईल, असे म्हणत कौतुक केले. जम्मू कश्मीरमधील 370 कलम हटले, राम मंदिर पण झाले आणि दिल्ली आता भाजप सरकार देखील स्थापन झाल्याचे म्हणत अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला. याच जन्मात सामान्य नागरी कायदा लागू होणार असल्याचे भाकीत देखील खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी वर्तवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com