Shrikant Shinde On Uddhav Thackeray : पूर्वी लोक 'मातोश्री'वर यायचे आणि आता..; खासदार शिंदेंची बोचरी टीका

Shrikant Shinde criticism of Uddhav Thackeray visit to Delhi : उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे.
Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Shrikant Shinde On Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटी घेतली. यात प्रामुख्याने काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटीवर भर दिसला. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे.

"पूर्वी लोक मातोश्रीवर यायचे आता दिल्लीत येऊन तीन दिवस वेळ मागत बसाव लागत आहे. महाराष्ट्राने हे पहिल्यांदा चित्र पाहिलं असेल", अशा तिखट शब्दात खासदार शिंदे यांनी टीका केला. 'ही लाचारी आहे. ही परिस्थिती पहिल्यादांच राज्याने पाहिली. भेटायची इच्छा नसताना फोन करून भेटायला बोलावलं, हे काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांनी मला खासगीत सांगितलं. यांची विचाराधारा बदलली आहे, हिंदुत्व सोडलं आहे. ज्यांच्या मतावर हे निवडून आले, त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम यांनी केले आहे', असे टोलाही खासदार शिंदे यांनी लगावला.

Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Chitra Wagh : चित्रा वाघांच्या सोयीच्या नैतिकतेचा बुरखा न्यायालयाने टराटरा फाडला

ठाकरेंचे खासदार पळून गेले

"ठाकरे परिवाराला विसर पडण्याची बीमारी आहे. मोदी आणि बाळासाहेबांचा फोटो लावून 2019 ला निवडून आले. काल वक्फ बोर्डाचे बिल आलं, असताना हे सभागृहातून पळून गेले. मुंबईत यांच्या एवढ्या जागा आल्या, त्या कोणाच्या मतावर आले, हे वेगळं सांगायला नको. अध्यक्षांनी सगळ्यांना बोलण्याचा वेळ दिला असताना, बिल सादर झाल्यावर यांचे 9 खासदार सभागृहातून पळून गेले, हे आम्ही काल सभागृहात पाहिले आहे. यावर आता मुस्लिम समाजाने विचार करायचा आहे की, तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्यावर ठाकरे गटाने भूमिका मांडली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजकारण सुरू आहे", असा देखील आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.

Shrikant Shinde On Uddhav Thackeray
Gulabrao Deokar: गुलाबराव, मी भाजपला मदत केली असेल तर सिद्ध करा, राजकारणातून संन्यास घेईल; देवकरांचे आवाहन

ठाकरे भाजपपेक्षा काँग्रेससोबत सहज

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्याने काँग्रेसश्रेष्ठींसोबत असलेले शिवसेनेच्या ठाकरे यांच्या पक्षाचे संबंध अधिक घट्ट अशल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे भाजपपेक्षा काँग्रेससोबत अधिक सहज असल्याचे या दौऱ्यात दिसले. महाविकास आघाडीत नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दोन्ही बाजूने समन्वय दिसला.

उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी दीड थांबा

उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनकड यांना काही दिवसांपूर्वी नवीन निवासस्थान मिळाले आहे. ठाकरे कुटुंबियांना ही नवी वास्तू दाखवण्यात आली. ठाकरे कुटुंबिय तब्बल दीड तास उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com