हे कारण पटणारे आहे का ? ; अशोक चव्हाणांना हायकमांडचा सवाल, बहुमत चाचणीस 'दांडी'

विधानभवन सभागृहाचे दार बंद झाल्याने अशोक चव्हाण यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.
Ashok Chavan
Ashok Chavansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिंदे सरकारची बहुमत चाचणी नुकतीच झाली. या चाचणीस सात आमदार अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. कॉग्रेसचे नेते (Congress), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे वेळेत विधानभवनात पोहचू न शकल्यामुळे त्यांना बहुमत चाचणी उपस्थित राहता आले नाही. ते बहुमत चाचणीस मुकले. (Ashok Chavan latest news)

सभागृहाचे दार बंद झाल्याने त्यांना बहुमत चाचणीस सभागृहात उपस्थित राहता आले नाही.(Maharashtra Floor test Live Updates) अशोक चव्हाण पोहोचले होते पण त्यांना २ मिनिटे विलंबामुळे लॉबीतच बसून राहावे लागले.

एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वास मत ठरावाला गैरहजर राहणाऱ्या अशोक चव्हाण यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची चर्चा आहे. "वाहतूककोंडीमुळे मला उशीर झाला हे कारण पटणारे आहे काय, याचा विचार करा," असा सवाल असे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के.पाटील यांनी केला असल्याचे समजते.

Ashok Chavan
भाजपच्या राज्यातच महिला खासदाराला वाईट वागणूक ; सामान गेस्ट हाऊसबाहेर फेकलं..

"हा प्रकार अत्यंत क्लेषदायक असून महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष कसा उभा राहून भाजपशी दोन हात कसे करणार," असेही एच.के. पाटील म्हणाले. दरम्यात बांद्रयाचे आमदार झीशान सिद्दिकी यांनीही आपला अंदाज चुकला ,प्रथम चर्चा अन नंतर विश्वासमत होईल, असे वाटले होते पण झाले उलटे त्यामुळे विलंब झाला असे सांगितले आहे. प्रणिती शिंदे या मात्र पूर्वसुचनेने गैरहजर राहिल्या.

या प्रकारावर कॉंग्रेस प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी श्रेष्ठींनी मुंबईची समस्या लक्षात घेताच यापुढे रणनीतीची आखणी करायला हवी, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Gangster Murder Mystery
Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com