Thane News : 'आनंद दिघें'वरुन ठाण्यात शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने; परांजपेंचा जोरदार पलटवार

NCP Vs Shivsena : '' दिघेचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार शिंदे गटाला नाही..''
Thane News
Thane NewsSarkarnama
Published on
Updated on

राहुल क्षीरसागर

Thane : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. दिघे यांच्यावर ज्यावेळी 'टाडा' कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मदत केली होती. जर शरद पवार यांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच 'टाडा'च्या बाहेर आले नसते असं वक्तव्य आव्हाड यांनी केलं आहे. यानंतर शिंदे गटाकडून आव्हाडांवर टीका केली जात आहे. आता शिवसेनेच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आनंद परांजपे(Anand Paranjape) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे सर्वस्व हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे होते. तर, शिंदे गटाचे सर्वस्व हे सत्ता हेच आहे. एका बाजूला आनंद दिघे असताना दुसऱ्या बाजूला राक्षसी महत्वकांक्षा, सत्तेची लालसा आणि गद्दारी याच्याशी निगडीत असल्याचा आरोप देखील परांजपे यांनी केला. तसेच यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेब हे त्याग, निष्ठा आणि समर्पणाचे मूर्तीमंत उदाहरण होते. त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार शिंदे गटाला नाही असा पलटवार परांजपे यांनी केला.

Thane News
Jejuri Temple Trust : 'येळकोट येळकोट जय मल्हार!' खंडोबा देवस्थान विश्वस्तमंडळावर आता स्थानिकांचं वाढलं 'बळ'

शिंदे गटावर आनंद परांजपे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले, गेले दोन दिवस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी कालची पत्रकार परिषद ऐकत असताना, धर्मवीर आनंद दिघे यांना शरद पवार यांनी टाडा लावला का? जामीन देताना शरद पवार(Sharad Pawar) हे न्यायाधीश होते का? असे सवाल उपस्थित करुन पुन्हा एकदा आपली बौद्धीक दळिद्रीपणाचे दर्शन जगाला घडविले आहे.

मला या निमित्ताने एकच सांगायचे आहे की, शरद पवार हे १९७६ पासून सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी व्यक्तीगत जीवनामध्ये अनेकांना मदत केलेली आहे. मात्र, त्यांनी ती कधीच कोणाला दाखवून त्याचे सार्वजनिक वक्तव्यं केले नाही. त्यामुळे १९८८-८९ साली ज्या काही घटना घडल्या; त्याबाबत वक्तव्ये करताना नरेश म्हस्के यांनी तारतम्य बाळगायला हवे. आनंद दिघे हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी गुरुवर्य, धर्मवीर आणि दैवत आहेत.

Thane News
Nilesh Lanke on Padalkar :...अन्यथा पडळकरांना नीट करायला वेळ लागणार नाही; निलेश लंकेंचा इशारा

दरम्यान, नरेश म्हस्के(Naresh Mhaske) यांना आपण थेट सवाल करत आहोत की, धर्मकार्य करताना जे नैतिक अधिष्ठान अंगी असावे लागते; ते आनंद दिघे यांचे नाव घेणाऱ्या म्हस्के यांच्या अंगी आहे का? क्षणभर विश्रांतीमध्ये ज्यांनी आपल्या निष्ठेचा शर्ट उतरवला होता. त्यांची आनंद दिघे यांचे नाव घेण्याची लायकी आहे का?, अशा शब्दात परांजपे यांनी नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटावर पलटवार केला.  

सत्तेसाठी तुम्ही मांडीला मांडी...

२०१७ मध्ये भिवंडी महानगर पालिकेची निवडणूक झाली. काँग्रेसचे ४७ नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेसचे जावेद दळवी हे महापौर झाले होते. त्यावेळी जिल्हाप्रमुख असलेले आणि निर्णय घेण्याचे अधिकार असलेले एकनाथ शिंदे यांनी मनोज काटेकर यांना का उपमहापौर केले? जावेद दळवी यांच्या मांडीला मांडी लावून त्यांना का बसवले? अंबरनाथला मनिषाताई वाळेकर या नगराध्यक्ष झाल्या.

त्यावेळी भाजपला बाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. त्या बदल्यात राष्ट्रवादीला सभागृहनेते पद दिले अशा अनेक घडमोडींचा पाढा वाचत सत्तेसाठी तुम्ही मांडीला मांडी लावून बसत होतात, हे उघड असल्याचे देखील आनंद परांजपे यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com