मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेतील (Shiv Sena) सोळा आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 12 जुलैपर्यंत मुदत दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकारविरोधात आजच (ता. 28) अविश्वास ठराव दाखल केला जाणार होता. पण अमावस्या असल्याने आता बुधवारी सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली. (Maharashtra Political Crisis)
भाजप आणि एकनाश शिंदे गटाकडून (BJP) अमावस्या संपल्यानंतर सरकार स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, असं सुत्रांकडून सांगितलं जात आहे. बुधवारी सकाळी 8.21 वाजता अमावस्या संपणार आहे. त्यानंतर सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो.
भाजपने अजूनही आपले पत्ते उघडे केले नाहीत. शिंदे गटाकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचा दावा भाजपचे नेते माध्यमांसमोर करत आहेत. पण दररोज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात नेत्यांची खलबतं सुरू आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटही भाजपसोबत जाण्यावर ठाम आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अनिश्चितता असली तरी सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल केला जाऊ शकतो. त्यानंतर भाजपकडून एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. पण त्याविरोधातही आघाडीकडून न्यायालयात दाद मागितली जाऊ शकते. त्यामुळे अजूनही दोन्ही बाजूकडील वकिलांची फौज यावर अभ्यास करत असल्याचे समजते.
न्यायालयाने सोमवारच्या निकालात फ्लोअर टेस्टबाबत काहीही उल्लेख केलेला नाही. कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी मात्र 12 तारखेनंतरच फ्लोअर टेस्ट घेता येईल, असं स्पष्ट केलं आहे. न्यायालयाचा निकाल सुस्पष्ट असून 12 तारखेपर्यंत सर्वस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या राजकीय स्थिती पूर्णपणे अनिश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.