
Shiv Sena Sheetal Mhatre : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. एकूण पाच जागांपैकी तीन जागा भाजपकडे, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक-एक जागा मिळाली आहे.
एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde) शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एक जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खरंतर शिवसेनेकडून सुरुवातीला शीतल म्हात्रे आणि संजय मोरे यांची नावे चर्चेत होती, मात्र जातीय समीकरणांचा विचार करून उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाल्याचे दिसून आले. अन् अखेर नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी काही तास आधीच शिंदे यांनी रघुवंशी यांच्या नावाची घोषणा केली.
तर उमेदवारी मिळाली नसल्याने शीतल म्हात्रे नाराज झाल्याचे बोलले जात असून, त्यांनी 'मंज़िलें अभी और भी हैं चलना अभी दूर तक और भी है', या शेरच्या माध्यमातून आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे. संजय खोडके हे विदर्भातील प्रमुख नेते असून, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत. त्यामुळे विधान भवनात आता पती-पत्नी दोघेही आमदार म्हणून दिसतील.
भाजपनेही(BJP) आपल्या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना तिघांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील संजय केनेकर यांना उमेदवारी दिल्याने, स्थानिक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता फडणवीसांचे आभार मानताना दिसत आहे. तर नागपूरमधून फडणीसांनी त्यांचे खास समर्थक संदीप जोशी यांना संधी दिल्याचे दिसून आले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.