

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोघेही १६ जानेवारीपासून नॉट रिचेबल झाले आहेत. या प्रकरणी हे दोघेही हरविले असल्याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे.
कोळसेवाडी पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, केडीएमसी निवडणूकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. १६ जानेवारी रोजी निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक संपर्कात नाही. पक्षाने त्यांच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली. पक्षाच्या बैठकीस बोलाविले.
व्हॉटसअप आणि ईमेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रतिसाद या दोन्ही नगरसेवकांकडून आला नाही. त्या पश्चात पक्षाने त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांना नोटीस बजावली. ही नोटीस त्यांच्या घरावरही चिटकवण्यात आली. त्यानंतरही या दोन्ही नगरसेवकांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे मोबाईल बंद आहेत.
१६ जानेवारीपासून ते संपर्कात नसल्याने त्यांच्या जिवीत सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवला आहे. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का ? त्यांची कोणी फसवणूक केली आहे का ? त्यांचे अपहरण करण्यात आले आहे का ? हे विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांचा शेवटच्या क्षणी कधी मोबाईल सुरु होता. त्यांचे शेवटचे मोबाईल संभाषण कोणासोबत झाले. ते शेवटचे कोणत्या ठिकाणी सीसीटीव्हीत आढळून आले ? या विविध अंगाने पोलिसांनी तपास करुन त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
बेपत्ता नगरसेवक शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला शिंदे सेनेकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. हे नगरसेवक संपर्कात नसल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडून सात नगससेवकांचा गट स्थापन केला आहे. मात्र ठाकरेंचे शिवसेनेतील विजयी उमेदवार राहूल कोट आणि स्वप्नाली केणे हे 2 नगरसेवक देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट स्थापनेत सहभागी झालेले नाही. ते देखील नॉट रिचेबल आहे. त्यांच्या विषयी ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र काही एक वाच्यता केलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.