मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यश्र शरद पवार (sharad pawar) यांनी आज पत्राचाळ घोटाळा प्रकरणी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांचे नाव भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी काल (मंगळवारी) घेतले होते. यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. "चौकशी करायची असेल तर लवकर करा, पण आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार का," असा सवाल पवारांनी राज्य सरकारला विचारला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या दौऱ्यांविषयी पत्रकारांनी पवारांना विचारले असता त्यांनी मनसेला टोला हाणला. पवार आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
"ज्या पक्षाला विधिमंडळात हातावरील बोटावर मोजण्या एवढे आमदारही निवडून आणता येत नाहीत, त्या पक्षाबाबत मी काय बोलणार," अशा शब्दात शरद पवारांनी मनसेवर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, "पत्राचाळ प्रकरणी तपास यंत्रणेनं चौकशी करावी, चौकशीनंतर आरोप सत्याला धरुन नसेल, तर आरोप करणाऱ्याचे सरकार काय करणार ?, आम्ही चौकशीला जाण्यासाठी तयार आहोत,"
आव्हाड म्हणाले, "शरद पवारांनी 14 ऑगस्ट 2006 मध्ये मिटींग घेतली होती. देशामधील हाउसिंगबाबतचे सर्व जण या मिटींगला उपस्थित होते. हा प्रकल्प 1988 चा असून तेव्हापासून पत्राचाळीचे टेंडर दारोदारी भटकत राहीले. शरद पवारांना बैठका काही नव्या नाहीत,"
"जेव्हापासून ते राजकारणात आले तेव्हापासून त्यांनी 10-20 हजार बैठका घेतल्या असतील. अनेक प्रकल्पांत त्यांनी मध्यस्थी करून बैठका घेतल्या. सगळे अडकलेले प्रकल्प, कोकण रेल्वेला दिशा देण्याचे काम शरद पवारांनी दिले," असे आव्हाड म्हणाले.
आव्हाड म्हणाले, "शरद पवारांनी मध्यस्थी केली नसती तर महाराष्ट्रात एकही प्रकल्प झाला नसता. त्यांनी गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणी बैठक घेतली यात काही नवल नाही. पत्राचाळ प्रकरणी अनेकांनी बैठका घेतल्या, पवारांनीही बैठक घेतली, पण या बैठकीत त्यांनी कुठलेही आदेश दिले नाहीत, सरकारने निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. याबाबत खुशार चौकशी करा,मात्र या प्रक्रियेत पवारांचा काहीही संबध नाही. चौकशी करा पण पराचा कावळा करू नका, "
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.