Raj Thackeray Dussehra rally : ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा, राज यांची उपस्थिती? अहिर यांचा 'तो' मुद्दा राऊतांनी खोडून काढला

Sanjay Raut & Sachin Ahir React to Raj Thackeray Presence at Shiv Sena Uddhav Thackeray Dussehra Rally : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या दसरा मेळाव्याची मुंबईत जय्यत तयारी सुरू आहे.
Raj Thackeray Dussehra rally
Raj Thackeray Dussehra rallySarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या दसरा मेळाव्याला उपस्थितीवरून मुंबईत चर्चा रंगली आहे. परंतु शिवसेना ठाकरे पक्षात राज ठाकरे यांच्या उपस्थितीवरून मतांतरे समोर आली आहे. याचा परिणाम दसरा मेळाव्यावर होतो की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.

आमदार सचिन आहेर यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असतानाच, खासदार संजय राऊत यांनी हा मेळावा शिवसेनेचा आहे, असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा मुंबईत दसरा मेळावा होत आहे. तसंच राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे. त्याचे श्रेय भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना देण्याची स्पर्धा सुरू आहे. दिल्लीत देखील व्होट चोरीचं प्रकरण तापलेले आहे. बिहार निवडणुकीत त्याचे पडसाद चांगलेच उमटले आहे. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक देखील होत आहे. या सर्व राजकीय घडामोडीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीत ठाकरे बंधूंची युतीची आणि एकत्र आल्याची चर्चेत, शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थितीवर चर्चेने जोर पकडला आहे. परंतु राज ठाकरे यांच्या उपस्थितीवरून शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षात मतांतरे दिसून आली आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरेंना आमंत्रण देखील दिले जाऊ शकते, असेही आमदार अहिर यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Dussehra rally
Manoj Jarange ultimatum : मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा 'अल्टीमेटम'; थेट 1994च्या जीआर हात घालण्याची तयारी

खासदार संजय राऊत यांनी मात्र आमदार अहिर यांचे म्हणणे खोडून काढले आहे. हा दसरा मेळावा शिवसेनेचा आहे आणि असतो. त्यामुळे राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे बंधूंचे 20 वर्षांनंतर सख्य झालं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेष करून मुंबईत हे दोघे बंधू एकत्र येत लढण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Dussehra rally
Ladki Bahin Yojana : 1500 की 3000? ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरचं जमा होणार! आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट

संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उत्तम संवाद सुरू आहे. मात्र दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत आपल्याला माहीत नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा मेळावा असतो. आमचीही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसे होणे शक्य नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com