Assembly Election 2024 : आमचं ठरलंय, आता तुम्ही ठरवा; शिंदेंच्या शिवसैनिकांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा

Khadakwasla Assembly Constituency : पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनंही खडकवासल्यावर दावा सांगितला आहे.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीतसाठी महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाची खलबत्ते सुरू आहेत. जागा वाटपात कुठली जागा कुणाला सुटणार, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. तरी, महायुतीतील मित्र पक्षांत असलेल्या इच्छुकांकडून मतदारसंघावर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यातच भाजपचा विद्यमान आमदार असलेल्या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केला आहे.

खडकवासला मतदारसंघातून भाजपचे भीमराव तापकर ( Bhimrao Tapkir ) हे विद्यमान आमदार आहेत. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी येथून निवडणूक लढविण्याचा निश्चिय केला आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
NCP Politics : भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा, फडणवीसांच्या निकटवर्तीय आमदाराला फटका?

विधानसभेबाबत महायुतीच्या ज्या बैठका झाल्या आहेत, त्यात ज्या ठिकाणी विद्यमान आमदार आहे, ती जागा त्या पक्षाला सोडण्यास वरिष्ठ नेत्यांची सहमती असल्याचं बोललं जात आहे. या सूत्रानुसार खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर हे आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला ( Bjp ) सुटण्याची शक्यता आहे.

पण, शिवसेना शिंदे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून लढण्याचं निश्चित केलं आहे. याबद्दल महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा आणि शिंदे गटाला ही जागा सोडावी, अशी मागणी वजा इशारा कोंडे यांनी दिला आहे.

यापूर्वी रमेश कोंडे यांनी शिवसेना ( Shivsena ) शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेण्याचा आवाहन केलं. त्यावर तुम्ही आगामी निवडणूक लढवावी, असा स्वर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावला. त्यानंतर आता रमेश कोंडे यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Pune BJP News : विधानसभेसाठी भाजपने मोहोळ अन् मुंडेंकडे सोपवली पुण्याची जबाबदारी!

शिवसेना शिंदे गटाच्या दाव्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये या मतदारसंघातून महायुतीतील नेत्यांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com