Uddhav Thackeray : लोकसभेनंतर विधानसभेचं मैदान मारायचं, कामाला लागा; ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश

Uddhav Thackeray On Assembly Elections : शिवसेनेतील बंडखोरी, आमदारांनी सोडलेली साथ आणि निवडणूक आयोगाने काढून घेतलेलं चिन्ह आणि नाव. हे सर्व आघात सोसूनही उद्धव ठाकरे लोकसभेच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरले आणि त्यांनी घवघवीत यश मिळवलं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama

Uddhav Thackeray On Assembly Elections : शिवसेनेतील बंडखोरी, आमदारांनी सोडलेली साथ आणि निवडणूक आयोगाने काढून घेतलेलं चिन्ह आणि नाव. हे सर्व आघात सोसूनही उद्धव ठाकरे लोकसभेच्या मैदानात पूर्ण ताकदीने उतरले आणि त्यांनी घवघवीत यश मिळवलं. महाविकास आघाडीत काँग्रेसनंतर राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा त्यांचा पक्ष ठरला.

त्यामुळे साहजिकच ठाकरे गटाचा कॉन्फिडन्स वाढला आहे. अशातच आता, जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका, विधानसभेच्या कामाला लागा असा आदेश ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. त्यामुळे आता लोकसभेचं मैदान मारल्यानंतर विधानसभेसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सज्ज झाल्याचं दिसत आहे.

सोमवारी (ता.10 जून) रोजी शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) पक्षप्रमुखे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवनात आमदार , खासदार, जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा अशा सूचना सर्वांना दिल्या. तसंच विधानसभेच्या जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका, त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, मात्र, तुम्ही तुमच्या कामाला लागा, असं त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितलं.

महाविकास आघाडी एकत्र लढणार

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या बैठकीबाबतची माहिती माध्यमांना दिली. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, "या बैठकीत विधानसभा, कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर निवडणुकीचा आढावा या बैठकीत घेतला. शिवाय विधानसभा निवडणूक आम्ही महाविकास आघाडी मधूनच लढणार आणि जिंकणारही."

Uddhav Thackeray
Supriya Sule : भविष्यात तुतारी की घड्याळ? सुप्रियाताईंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या, "काही गोष्टी पोटात…"

तसंच राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून लढू आणि 180 जागांवर विजयी होऊ असा निर्धार या बैठकीत केल्याचंही राऊतांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com