BJP VS Shivsena : भाजप-शिवसेनेत चढाओढ; 'केडीएमसी'बाबत मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या शब्दाची रवींद्र चव्हाणांना आठवण

KDMC Corporation Politics : "पूर्वी मातोश्रीवरून गडबड, आता भाजपचा महापौर होणार"
Eknath Shinde, Ravindra Chavan
Eknath Shinde, Ravindra ChavanSarkarnama

Mumbai Political News : सध्या राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार, याबाबत कुणीही ठोसपणे सांगतना दिसत नाही. असे असतानाही कल्याण डोंबवली महापालिका (केडीएमसी) महापौर निवडीवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरू झाली आहे. या वेळी केडीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल, असे म्हणत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका अंतर्गत वादानेही गाजणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

रवींद्र चव्हाणांनी (Ravindra Chavan) आगामी निवडणुकीनंतर 'केडीएमसी'मध्ये भाजपचा महापौर असेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या शब्दाचीही आठवण करून दिली आहे. ते म्हणाले, 'यापूर्वी मातोश्रीवरून गडबड होत होती; नाही तर एकनाथ शिंदे यांनाही वाटत होते की, 'केडीएमसी'मध्ये भाजपचा महापौर असावा. आता आपल्याला संधी असून, 'केडीएमसी'मध्ये भाजपचा महापौर असेल. एकनाथ शिंदे वायद्याचे पक्के असून, ते शब्दाला जगातील.' निवडणुकीपूर्वीच केडीएमसी महापौराबाबत भाजपने केलेल्या दाव्याने शिवसेना सावध झाली आहे. आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Ravindra Chavan
Dharashiv Politics: धाराशिवकरांना मिळणार मोठं 'गिफ्ट'; पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मागवला आराखडा

कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने पदाधिकारी, कार्यकारिणी नियुक्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, शशिकांत कांबळे, नरेंद्र पवार, नरेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कल्याण पूर्वमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड व शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर चव्हणा म्हणाले, आता कोणाला घाबरू नका, बोलायला सुरुवात करा. पक्ष संघटन तुमच्या नेहमी पाठीशी उभे असेल. फळ लागलेल्या झाडावरच लोक दगड मारतात. त्यामुळे काम करत राहा,' असा सल्ला दिला. (Maharashtra Political News)

चव्हाण म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना-भाजप एकत्र होते. त्यावेळी केडीएमसीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या बैठकीत कोणी किती काळ महापौर व उपमहापौर राहावे, याचा 'फॉर्म्युला' ठरला होता. २०१९ ला शेवटच्या टप्प्यात थोडी गडबड झाली. भाजपची वेळ आली त्यावेळी शिवसेना पक्ष नेतृत्वाने नकार दिला.' उद्धव ठाकरेंवर नाव न घेता आरोप केल्यानंतर चव्हाणांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.

ते म्हणाले, 'मातोश्रीवरून गडबड झाल्याने भाजपची संधी गेली असेल. आता मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शब्दाला पाळणारे आहेत. भाजपला महापौर नाकारल्यानंतर शिंदेंनी सांगितले होते, की रवी अडचण फक्त मातोश्रीवरून आहे. मला असे वाटते की, महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे. आता केडीएमसीवर महापौर बसवण्याची संधी आहे. कारण एकनाथ शिंदे शब्दाला जागणारे आहेत. त्यांनाही भाजपचा महापौर व्हायला हवा होता, असे वाटत होते. आता भाजपमधून महापौर कोणाला करायचे याविषयी स्पर्धा असेल,' असे त्यांनी सूतोवाच केले.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde, Ravindra Chavan
Pimpri Chinchwad NCP : शरद पवार राष्ट्रवादीत तरुणाईचे नवे पर्व; आता रोहित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com