
Ambarnath News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे राजकारण तापलं आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण, हत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटनांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहे. त्यामुळे खाकी वर्दीचा धाक उरला आहे की नाही असा खडासवालही नागरिकांकडून केला जात आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कॉमन मॅनसोबतच आता राजकीय नेतेमंडळीही सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे.अंबरनाथचे शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार बालाजी किणीकर हे कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. हीच संधी साधून त्याच कार्यक्रमाच्या ठिकाणी किणीकर यांच्या हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती आमदारांना समजलं. यानंतर त्यांनी तत्काळ ठाणे पोलीस आयुक्तांना संपर्क करत हत्येच्या सुपारीची माहिती त्यांनी दिली.
पोलीस आयुक्तांनी आमदार किणीकर यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत वेगानं तपासाची सूत्रे फिरवली. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून हत्येची सुपारी प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही शूटर हे शिवसेनेचेच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मात्र,अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे अत्यंत विश्वासू व कडवट शिवसैनिक म्हणून बालाजी किणीकर यांची ओळख आहे.ते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंबरनाथमधून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.गटबाजीतून किणीकरांच्या हत्येचा प्लॅन करण्यात आल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण आमदार किणीकर हे लग्न सोहळ्यासाठी लातूर येथे आले असताना त्यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी अतिशय जवळच्या माणसाने हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मला मिळाली होती. ती माहिती आपण तात्काळ पोलिसांना दिली. याचवेळी आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंतही संबंधित माहिती पोहोचवण्यात आल्याचेही आमदार किणीकर यांनी सांगितले.
तसेच अंबरनाथचा इतिहास हा अनेक नगरसेवकांच्या हत्येचा आहे. तसा माझ्या बाबतीतही कट रचला जात होता. मात्र, वेळीच तो कट उघड झाला आहे. पण या हत्येतील मुख्य सूत्रधार कोण आहेत, त्याच्यापर्यंत पोलीस नक्कीच पोहचतील असा विश्वास शिवसेना आमदार किणीकर यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.