'किरीट सोमय्यांच्या आयएनएस 'विक्रांत फाईल' नंतर येत आहे 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी'

BJP|Shivsena|Kirit Somaiya|Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा आरोप केला आहे.
Sanjay Raut, Kirit Somaiya
Sanjay Raut, Kirit Somaiyasarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून अजून एका घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. सोमय्या कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा-भाईंदर महानगरपालिका व अन्य ठिकाणी सुमारे १०० कोटींचा 'टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आयएनएस 'विक्रांत फाईल' नंतर येत आहे 'टॉयलेट एक लव्ह स्टोरी, अशा शब्दात ट्वीट करत राऊतांनी सोमय्यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
...,म्हणूनच पवार साहेबांचं राज ठाकरेंवर अन् मनसेवर बारकाईने लक्ष

सोमय्यांचा हा घोटाळा आपण लवकरच कागदपत्रांसह बाहेर काढणार असल्याचा इशाराही राऊतांनी दिला आहे. सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठानचा कारभार बघतात. त्यांनी हा घोटाळा केला असून या घोटाळ्याचे पुरावे आणि अहवाल कुठे आहेत, हे त्यांच्या कुटुंबीयांनाही माहिती असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी (ता.15 एप्रिल) मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

राऊत म्हणाले, सोमय्या हे विक्रांत घोटाळ्यातील आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना आता इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा हक्क नाही. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नसून सोमय्यांचा महाराष्ट्रात दुर्गंध पसरवणारा घोटाळा लवकरच बाहेर येणार आहे. सोमय्यांनी 'आयएनएस विक्रांत'पासून टॉयलेट घोटाळ्यात पैसे खाल्ले आहे. १०० कोटींच्या टॉयलेट घोटाळ्यात युवा प्रतिष्ठानकडून खोटी बिलं तयार करून पैसे लाटण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच पुढील काळात आम्ही त्यांचे अजून काही घोटाळे बाहेर काढणार असल्याचा सांगत सोमय्यांना आता खुलासेच द्यावे लागणार असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut, Kirit Somaiya
'हिंदुजननायक' राज ठाकरे : मनसैनिकांनी पुण्यातील कार्यक्रमाआधी दिली नवी उपाधी!

याबरोबरच देवेंद्र फडणवीसांवर टीका करतांना राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाराविषयी कणव असणाऱ्या फडणवीसांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर काहीतरी बोलले पाहिजे होते. एरवी त्यांची आणि भाजप नेत्यांची राष्ट्रभक्ती उचंबळून येत असते. फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना १४ ट्विटस केली. मात्र, त्यांनी एखादे ट्विट आयएनस विक्रांत घोटाळ्यासंदर्भातही करायला पाहिजे होते, असा टोला फडणवीसांना लगावला.

उद्या दाऊद इब्राहिम पाकिस्तानत बसून दहशतावादाविरोधात बोलायला लागला तर त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का? असा सवाल करत तशीच काही अवस्था सोमय्यांची झाली आहे. आता सोमय्यांनी केलेल्या आरोपांवर कोणी विश्वास ठेवणार नाही, असा टोमणाही राऊतांनी सोमय्यांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com