Sanjay Raut : राऊतांचे DCM पवार अन् मुंडेंवर खळबळजनक आरोप; CM फडणवीस राजीनामा घेणार का?

ShivSena MP Sanjay Raut Mumbai CM Devendra Fadnavis Dhananjay Munde DCM Ajit Pawar Mahayuti crime Beed : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजित पवार आणि धनंजय मुंडेंबाबत मोठी मागणी केली.
Sanjay Raut 5
Sanjay Raut 5Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील गुन्हेगारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तत्पूर्वी त्यांनी गंभीर आरोप केले. संजय राऊत यांच्या या आरोपांवर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

तसेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याबरोबर अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत खळबळ उडवून दिली.

संजय राऊत म्हणाले, "बीडमधील हत्यामागे असलेला सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत, एक नाही दोन मंत्री त्या भागातले आहेत. कुणी भाजपमध्ये, तर कुणी अजित पवारांसोबत आहेत. धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा राजकीय आशीर्वाद आहे".

Sanjay Raut 5
Radhakrishna Vikhe : विखे-थोरातांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार; महायुतीकडून संगमनेरमध्ये 'स्थानिक'साठी मोर्चेबांधणी

'लोकभावना तीव्र आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिला पाहिजे. फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे. एवढेच नव्हे तर, अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतले, म्हणून त्यांचा देखील राजीनामा घेतला पाहिजे". ही मागणी अत्यंत काळजीपूर्वक, हिंमतीने, धाडसाने सांगतो आहे. याची किंमत मला मोजावी लागेल', असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut 5
Dinvishesh 25 December : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी; वाचा आजचे दिनविशेष

'राज्यात काय चालले आहे, हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिसत नाही का? निवडून येण्याची क्षमता आहे, म्हणून ते तुमच्याबरोबर आहे. परळी विधानसभा मतदारसंघावर 118 बूथ केंद्रावर मतदान होऊ दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगाला हे दिसले नाही का? निवडणूक आयोग आम्हाला नियम आणि अक्कल शिकवतोय', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

"परळीत 118 ठिकाणी मतदान करू दिलं नाही. हा अर्बन नक्षलवाद आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असेच मतदान होऊ दिलेले नाही. या अर्बन नक्षलवादाचे कमांडर देवेंद्र फडणवीस आहे. राज्यात अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस आणि भाजप पोसत आहे", असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

बीडमध्ये सात ते आठ हजार बेकायदेशीर शस्त्र

"बीडमधील असले प्रकार पूर्वी बिहारमध्ये, असे चालायचे. बीड, कल्याण, अंबरनाथ, डोंबिवलीमध्ये, असे चित्र दिसते आहे. बीडमध्ये गेल्या काही दिवसांत, काय चालले आहे, त्यावर गृहमंत्र्यांनी कारवाई करावी. बीडमध्ये गेल्या काही दिवसांत 38 हत्या झाल्या आहेत. त्यात बहुतांशी वंजारी समाजाच्या आहेत. 29 तारखेला निघत असलेला मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही. संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक केला. बीडमधील अर्बन नक्षलवाद संपवा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तसेच सात ते आठ हजार बेकायदेशीर शस्त्र आहेत. ती नेपाळ आणि बिहारमधून आणली आहेत", असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com