Shivsena News : ठाकरे-वंचित युतीत पहिली ठिणगी : 'कोण संजय राऊत?' म्हणत आंबेडकरांनी फटकारले..

Thackeray Ambedkar Alliance : "आम्हाला सल्ले देणार संजय राऊत कोण? "
Thackeray Ambedkar Alliance : Uddhav Thackeray : prakash Ambedkar : Sanjay Raut
Thackeray Ambedkar Alliance : Uddhav Thackeray : prakash Ambedkar : Sanjay RautSarkarnama

Shivsena News : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन यांची युतीची घोषणा झाली. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत, ही युती जाहीर केली होती. एकिकडे ठाकरेंची शिवसेना आणि वंचित हे जवळ येत असताना आंबेडकर यांनी ठाकरे गटाचे निष्ठावान नेते अन् धडाडणारे तोफ म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊतांवर मात्र टीका केली आहे. यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. 'शरद पवार हे आजही भाजप सोबतच आहेत, असं विधान करुन आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी आंबेडकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनीही आंबेडकरांना याबाबत सबुरीचा सल्ला दिला होता.

Thackeray Ambedkar Alliance : Uddhav Thackeray : prakash Ambedkar : Sanjay Raut
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रकाश आंबेडकरांच्या शरद पवारांविषयी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही हे स्पष्ट केलं होतं. पण पवार हे राज्यातच नाही तर देशातलं एक उत्तुंग नेते आहेत. तसेच, ते देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न केला जात असताना, त्याचे स्तंभ हे शरद पवार आहेत. सातत्याने या आघाडीसाठी ते प्रयत्न करत आहेत, राऊत म्हणाले होते.

'महाविकास आघाडीचा (MVA) भाग होण्याची प्रक्रिया सुरु असताना त्याचे स्तंभ शरद पवार यांच्याबद्दल आदर ठेवून बोललं पाहिजे. मतभेद असले तरी त्यांच्याविषयी बोलताना आदर ठेवायला पाहिजे, असा सल्लाही राऊतांनी आंबेडकरांना दिला आहे.

Thackeray Ambedkar Alliance : Uddhav Thackeray : prakash Ambedkar : Sanjay Raut
Uddhav Thackeray : "बरे झाले गद्दार गेले म्हणून हिरे सापडले"; ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल!

यावर आंबेडकर यांनी एका वाक्यात राऊतांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे.आंबेडकर म्हणाले, 'मला हा सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला असता, तर तो मी मानला असता. पण, कोण संजय राऊत कोण? आम्हाला सल्ला देणारे राऊत कोण आहेत? असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना डिवचले आहे.

यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती आकाराला येत असताना सुरूवातीलाच असे मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. यामुळे आता शिवसेना - वंचित युतीच्या भविष्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरेंच्या अत्यंत जवळ असलेल्या राऊंतावर आंबेडकरांनी टीका केल्यामुळे या युतीचा प्रवास पुढे कसे जाणार, या बाबत साशंकता व्यक्त होत आहे.

Thackeray Ambedkar Alliance : Uddhav Thackeray : prakash Ambedkar : Sanjay Raut
Maharashtra Politics: पवारांविषयीच्या 'त्या' विधानावर आंबेडकरांचं घूमजाव; राऊतांच्या सल्ल्यालाही केराची टोपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com