Maharashtra Politics : महाराष्ट्राचं राजकारण दर तीन दिवसांनी बदलतंय; नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?

Neelam Gorhe Statement : नरहरी झिरवाळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारतील, असं वाटलं नव्हतं, त्यामुळे राज्याचे राजकारण वेगाने बदलत आहे. त्यातूनच जागा वाटपासारख्या विषयावर बोलणं खूप घाईचं होईल, असेही सांगून राष्ट्रवादीबाबतच्या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.
Dr. Neelam Gorhe
Dr. Neelam Gorhe Sarkarnama
Published on
Updated on

Solapur,06 October : महाराष्ट्रातलं राजकारण दर तीन दिवसांनी खूप वेगाने बदलत आहे, त्यामुळे जागावाटपावर सध्या बोलणे खूप घाईच होईल. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, एवढं भावनिक होऊन ते मंत्रालयात उड्या मारतील, असं वाटलं नव्हतं, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी करून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीत राहण्याबाबत शंका व्यक्त केली.

डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe ) आज सोलापूरच्या दौऱ्यावर आल्या होत्या. माध्यमांशी संवाद साधताना गोऱ्हे यांनी राज्यातील अस्थिर राजकारणावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून माध्यमातून अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडण्याची चर्चा चालली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या दौऱ्यात महायुतीमधील तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, असे स्पष्ट केले. मात्र, गोऱ्हे यांच्या आजच्या विधानावरून पुन्हा चर्चेला तोंड फुटू शकते.

नरहरी झिरवाळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारतील, असं वाटलं नव्हतं, त्यामुळे राज्याचे राजकारण वेगाने बदलत आहे. त्यातूनच जागा वाटपासारख्या विषयावर बोलणं खूप घाईचं होईल, असेही सांगून राष्ट्रवादीबाबतच्या (NCP) चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. याबाबत गोऱ्हे यांना अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडणार का, असा सवाल विचारला असता ‘मी तसं म्हटलेलं नाही’ असे सांगून त्यांनी हात झटकले.

खूप गोष्टींमध्ये मी एकटी पडलेली असली, तरी मी एकटी नाही, असे सांगून गोऱ्हे म्हणाल्या, संपूर्ण जगात 50 टक्के महिला आहेत, त्यामुळे दोन तृतीयांश महिला काम करतात. मात्र फक्त 1 टक्का महिलांच्या नावावर प्रॉपर्टी आहे. लाडकी बहीण योजना ही भीक, दया किंवा लाच नसून महिला सक्ष्मीकरणासाठी उचलेले पाऊल आहे.महिला सुरक्षेचा प्रश्न घटताना दिसत आहे. मात्र, यात कुटुंबांतर्गत प्रश्न आहेत आणि दुसरं म्हणजे सामाजिक प्रश्न आहेत.

Dr. Neelam Gorhe
Solapur Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेचा सोलापूरमधील पाच मतदारसंघावर दावा; महायुतीत पडणार वादाची ठिणगी

जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आमचा थेट सामना होतो, तिथे आम्हाला यश मिळत आहे, हे आता सिद्ध झालं आहे. सुशीलकुमार शिंदे हे जेष्ठ नेते आहेत, त्यांना 84 व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं महत्व लक्षात आलं. त्याच पद्धतीने प्रणिती शिंदे यांना 84 व्या वर्षी लाडकी बहीण योजना आणि एकनाथ शिंदे यांचं महत्व लक्षात येईल, त्यांना दीर्घायुष्य लाभो, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लाडकी बहीण योजना कशी बंद होईल, असं कांही काँग्रेस नेते बोलतात, तर काही काँग्रेस नेते हे योजनेचे पैसे डबल करण्याबाबत बोलतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित पैसे देण्याचा विचार हा सरकारचा आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सावत्र बहिणीसारखा विचार होणार नाही. ज्या पद्धतीने एका बाजूला सेक्युलर बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला भगवा दहशतवाद बोलायचं, अशी काँग्रेसवाल्यांची दुटप्पी भूमिका आहे.

पंढरपूर कॉरिडोअरपेक्षा प्रति पंढरपूर वसवण्यासाठी स्थानिक लोक सकारात्मक आहेत. पंढरपूरसोबत देहू, आळंदीचा विकास त्याच धर्तीवर करण्याचा सरकारचा विचार आहे. मीडियाचे नितीन गडकरी यांच्यावरील प्रेम पाहता, गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या भाजपचे आम्ही भाग होईल का, असं वाटत आहे. पक्षाचा असो किंवा बाहेरचा असो भूखंड माफियांना क्षमा केली जाणार नाही. मात्र, हे तपासून पहिले जाईल आणि त्यानंतर त्यावर निर्णय होईल, असा इशाराही त्यांनी भूखंड माफियांना दिला.

Dr. Neelam Gorhe
Vitthal Parivar : आमदार यशवंत मानेंवर विठ्ठल परिवार नाराज; 'आतापर्यंत गप्प होतो, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही'

संभाजीराजे हे अभ्यासू नेते आहेत, ते रिपोर्ट्स वाचून निर्णय घेतील. संभाजीराजे हे 200 कोटींचा हिशेब मागत असतील, तर तो राज्य सरकार देईल, असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com