Kedar Dighe on Eknath Shinde : शिवसेना वाचवण्यासाठीच नागरिक शिंदेंची सभा सोडून जातात...

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांचा हल्लाबोल
Kedar Dighe, eknath shinde
Kedar Dighe, eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News : शिवसेना नाव आणि चिन्ह भाजपच्या मदतीने घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून शिवसेना वाचवण्यासाठीच नागरिक शिंदे यांच्या सभेतून उठून जात असून खुर्च्या रिकामी रहात असल्याचा जोरदार हल्लाबोल ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी कोल्हापूर मधील नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या सभेनंतर केला आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना दुसरीकडे सभेतील नागरिक मोठ्या संख्येने सभा सोडून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नागरिकांचे जथेच्या जथे बाहेर पडत असून मैदान रिकामी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे नागरिक उठून जात असतानाही शिंदे भाषण ठोकत असल्याचेही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Kedar Dighe, eknath shinde
Talathi Recruitment News: नव्या तलाठी भाऊसाहेबांची क्रीम पोस्टिंगसाठी फिल्डींग

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी केलेली गद्दारी शिवसैनिकांना आवडलेली नाही. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह भाजपच्या मदतीने घेणाऱ्या शिंदेंपासून शिवसेना वाचवण्यासाठीच नागरिक मोठ्या संख्येने शिंदेंच्या सभेतून उठून जात असल्याचा घणाघात केदार दिघे यांनी आहे. सोशल मीडियावर याबाबत केदार दिघे यांनी केलेल्या पोस्टची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगू लागली आहे.

Kedar Dighe, eknath shinde
Jharkhand Politics : मोठी बातमी ! झारखंडमधील चंपई सोरेन सरकार संकटात; 12 आमदार बंडाच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com