Sanjay Raut On Ram Mandir : 'आमच्या लग्नाला यायचं हं! राम मंदिराचं मंगल कार्यालय झालंय'; राऊत भडकले...

Sanjay Raut On Ram Mandir : भाजपवाले लग्न पत्रिका वाटल्यासारख्या पत्रिका वाटतात संजय रावतांची टीका..
Sanjay Raut On Ram Mandir :
Sanjay Raut On Ram Mandir :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपा आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटांमध्ये राम मंदिराच्या कार्यक्रमावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचा निमंत्रण मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर सोहळ्याच्या पत्रिकांचा थेट लग्नपत्रिका असा उल्लेख केला आहे. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Latest Marathi News)

Sanjay Raut On Ram Mandir :
Nanded NCP News : अजितदादांकडून नांदेडमध्ये कार्यकर्त्यांना बळ, सहाजणांची `डीपीडीसी`वर नियुक्ती..

शिंदे-अजित पवार मोदी भक्त झालेत

संजय राऊत यांनी आज सकाळी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारमध्ये राज्य सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मोदीमय झालेले आहेत. पूर्वी हे दोघेही मोदींच्या धोरणावरती सडकून टीका करत होते मात्र आता ते मोदी भक्त झाले आहेत. त्यांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे .

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटं बोलत आहेत

विदर्भात गेल्या दीड वर्षाच्या काळामध्ये चौदाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मराठवाड्यात देखील हीच परिस्थिती आहे. यवतमाळ मध्ये गेल्या 15 दिवसात 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशा परिस्थितीत देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर हे सरकारी योग्य दिशेने चाललाय असं म्हणत असतील तर ते खोटं बोलत आहेत.अशी टीका राऊत त्यांनी केली.

Sanjay Raut On Ram Mandir :
Ncp News : राष्ट्रवादीचा एक बडा नेता लोकसभेच्या तयारीत..!

गेल्या दीड वर्षात या सरकारने फक्त आमदार खासदारांचा भाव वाढला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस मधले कार्यकर्ते फोडण्यासाठी भाजप ऑक्शन पद्धतीने भाव लावत आहे. नगरसेवकांसाठी आमदारांसाठी खासदारांसाठी वेगवेगळे भाव त्यांनी लावले आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला अद्यापही भाव मिळालेला नाही.

राम मंदिर कार्यक्रमाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, हा कार्यक्रम संपूर्ण भाजपाने हायजॅक केला आहे.हा कार्यक्रम देशाचा व्हायला हवा होता. हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. मात्र भाजपने त्याला राजकीय सोहळा केला आहे. आपल्या घरातील लग्न किंवा मुंजा असावी अशा पद्धतीने भाजप राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका वाटत आहे. आमच्या लग्नाला यायचं हा अशा पद्धतीने हे निमंत्रण पत्रिका वाटत आहेत यांनी राम मंदिरांचं मंगल कार्यालय करून ठेवलं असल्याची टीका राऊत यांनी केली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com