Shivsena Politics : शिवसेनेतील फूटीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांचा कट्टर शत्रू बनले आहेत. हे शत्रुत्व त्यांच्या नेत्यांमध्ये देखील दिसून येते. स्थानिक पातळीवर देखील दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टोकाची टीका करत असतात. मात्र, कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील आंदोलन त्याला निमित्त ठरले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. या निर्णया विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि हिंदुत्वादी संघटना एकत्र येऊन दुर्गाडी किल्ल्यावर घंटानाद आंदोलन करणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी म्हणाले, मागील 35 वर्षांपासून घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. बकरी ईदच्या दिवशी हिंदुंचे मंदिर बंद ठेवले जाते. हिंदू भक्तांना मंदिरात प्रवेश नाकारला जातो.मंदिर बंद ठेऊन हिंदुंची अस्मिता दुखावली जाते. घटनेने आम्हाला अधिकार दिलाय की कधीही जाऊन दर्शन घेण्याचा तो रोखला जातोय. गेल्या 35 वर्षांपासून आंदोलन करत आहोत. दिघेसाहेबांनी हे आंदोलन सुरु केले होते.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले, गेल्या 35 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. ईद आणि नवरात्र एकत्र आले होते तेव्हा मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते. तसेच आताही मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवावे. एसपींनी बैठकी बोलावली होती. आम्ही आमची बाजु मांडली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही. हिंदू सहिष्णु आहे. दोन दिवसामध्ये पोलिस आम्हाला त्यांचा निर्णय सांगणार आहेत.
एसपींनी बोलवलेल्या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर आणि विजय साळवी एकत्र होते. बैठकीनंतर बोलताना साळवी म्हणाले, आम्ही पक्षाचे लेबल घेऊन आलो नव्हतो. आम्ही हिंदू म्हणून आलो होतो आणि हिंदू म्हणून आम्ही एकत्र आहोत. तर, आमदार भोईर म्हणाले, आम्ही राजकीय असलो तरी हिंदू म्हणून एकत्र आलो होतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.