
Election Commission News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आकडेवारीत घोळ झाल्याचा आक्षेप काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आला होता. या विरोधात काँग्रेसने कोर्टात देखील धाव घेतली आहे.मात्र, निवडणूक आयोगाने आकडेवारीत कोणताही घोळ नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मतदान उशीरापर्यंत सुरू असल्याने नेमकी आकडेवारी लगेच जाहीर केली नसल्याचे सांगितले जाते. कधीकधी तर किती टक्के मतदान झाले हे दुसऱ्या दिवशीच जाहीर केले जाते.
मतदान सुरू असताना दर चार ते पाच तासांनी निवडणूक आयोगाकडून मतदानाची आकडेवारी जाहीर केली जाते. एकुण किती टक्के मतदान झाले हे थेट दुसऱ्याच दिवशी समजते. त्यामुळे अनेकदा उमेदवार आणि विरोधी पक्षांकडून मतदानाच्या आकडेवारीवर संशय घेतला जातो. मात्र, आता मतदानाची नेमकी आकडेवारी किती याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण मतदानाच्या आकडेवारी संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार चार ते पाच तासांनी मतदानाची आकडेवारी जाहीर न करता दर दोन तासांनी आयोगाच्या वोटर टर्न आऊट (Voter Turnout Ratio – VTR) या अॅपवर जाहीर अपडेट केली जाईल. पूर्वी निवडणूक केंद्रावरील अधिकारी आकडेवारी गोळा करून निवडणूक आयोगाकडे पाठवली जात होती. मात्र, आता केंद्रावरील अधिकारी आकडेवारी भरतील.
केंद्रावरील निवडणूक अधिकारी मतदानाची आकडेवारी अपडेट करणार आहेत. तसेच पूर्वी सुरू असलेली मतदान समाप्तीनंतर उमेदवारांचे प्रतिनिधी असलेल्या पोलिंग एजंटला फाॅर्म 17C देणे बंधनकारक होते ते कायम असणार आहे.
बिहार निवडणुकीच्या आधीपासून मतदानाची टक्केवारी अपडेट करण्याची सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे मतदान सुरू असताना दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी समजणार आहे. जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही, तिथे ही माहिती ऑफलाइन स्वरूपात साठवून, नेटवर्क पुन्हा उपलब्ध झाल्यावर ती अपलोड केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.