Video Aaditya Thackeray On CET Exam : 'पैसे कमविणे हाच सीईटी परीक्षेचा उद्देश होता का?' आदित्य ठाकरेंचा प्रश्न !

CET Exam Scam : परीक्षेचे काही पेपर अवघड होते तर काही सोपे होते, अशी भूमिका आता सीईटी सेल घेत आहे. मग तुम्ही उत्तरपत्रिका का देत नाहीत ?
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

Mumbai News : राज्यात झालेल्या सीईटी परीक्षेत झालेल्या गोंधळावरून माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटानचे नेते आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दात टीका केली आहे. सीईटी परीक्षेत झालेला गोंधळ पाहता पैसा कमाविण्याासाठीच ही परीक्षा घेतली आहे का ? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे. जोपर्यंत हा गोंधळ सुटत नाही, तोपर्यंत अभियांत्रिकी प्रवेशाला स्थगिती द्यावी, ही मागणी ठाकरे यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविष विषयावर आपली भूमिका मांडली. सीईटी परीक्षेत झालेल्या गोंधळावरून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण सीईटी सेलने जाहीर करावे. तसेच या परिक्षेवर हरकत घेण्याासाठी विद्यार्थ्यांकडून जे पैसे घेतलेले आहे. ते तातडीने परत करावेत. प्रत्येक बॅच चा टॉपर समोर आणावा, मेरिट समोर आणावे. तसेच या परीक्षेची उत्तरपत्रिका (आन्सरशिट) जाहीर करावी, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

Aditya Thackeray
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आयोगानं कंबर कसली...

आदित्य ठाकरे म्हणाले, सीईटी परीक्षा ही 24 बॅचेस मध्ये घेण्यात आली. जो एकच पेपर होता केवळ त्यातील प्रश्न वेगळे होते. या परीक्षेवर काही हरकत असल्यास त्याची शहानिशा करण्यासाठी सत्यता पडताळण्यासाठी एक हजार रुपये घेण्यात आले. या सीईटीच्या परीक्षेवर 1 हजार 425 हरकती घेण्यात आल्या. म्हणजे सीईटी सेलने या परीक्षेच्या माध्यमातून किती पैसे कमाविले. पैसे कमाविणे हाच उद्देश याचा होता का, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली आहे. आता या परीक्षेत 54 चुका असल्याचे समोर आले आहे.

Aditya Thackeray
Lok Sabha Pro-Tem Speaker : मोदींनी पहिला पंगा घेतला! काँग्रेस संसदेत देणार टक्कर

या परीक्षेत समोर आलेल्या 54 चुका या सीईटी सेलने केलेल्या आहेत. मग सीईटीची सेलच्या आयुक्तांना का ठेवलं आहे, असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. या परीक्षेची उत्तरपत्रिका तीन दिवसात गायब झाल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला. या परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये (Student) गोंधळ निर्माण झाला आहे. या परीक्षेचे काही पेपर अवघड होते तर काही सोपे होते, अशी भूमिका आता सीईटी सेल घेत आहे.

मग तुम्ही उत्तरपत्रिका का देत नाहीत ? माहिती का लपविली जात आहे. यामध्ये पारदर्शकता का ठेवली जात नाही. प्रत्येक बॅच मध्ये टॉपर कोण? हे कळत नाहीये. विद्यार्थ्यांचे गुण एक सारखे आणि परसेंटेईल वेगवेगळे आहेत. ज्या हरकती निकाली निघाल्या आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी पैसे दिले आहेत. ते पैसे सीईटी सेलने संबधित विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com