
Shiv Sena MNS alliance : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी येऊ घातल्या आहेत, या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक उलथापालथी होत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहे. तशा दोन्ही ठाकरे बंधुंनी एकमेकांना युतीच्या टाळ्या दिल्या आहेत.
ठाकरे विरोधकांना याची चांगलीच धडकी भरली आहे. विशेष करून, ठाकरे बंधुंच्या या युतीकडे भाजपचं लक्ष लागलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी आता ठाकरे बंधुंच्या भेटीबाबत मोठं विधान केलं आहे.
शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब म्हणाले, "दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, असे मराठी लोकांच्या मनात आहे. विशेष म्हणजे, दोन्ही ठाकरे देखील सकारात्मक आहेत. चर्चेची दार कधीच बंद केली नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अगोदरच सांगितलं आहे. आता लवकर दोन्ही नेते भेटतील, चर्चा करतील आणि पुढचं ठरवतील".
दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय होईल, त्यानुसार आम्ही पुढं जाण्यासाठी तयार आहोत. जशा निवडणुका (Election) जवळ येतील, तसे दोन नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे. दोघे नेते बसतील आणि ठरवतील, असेही अनिल परब यांनी म्हटले.
राज ठाकरे यांनी ठरवायचं आहे की, त्यांनी आमच्यासोबत यायचं काही नाही यायचं! उद्धव ठाकरे यांनी तर सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत, असे पूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे युतीबाबत लवकरच ठरेल, असे अनिल परब यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळाच्या समावेशावरून, अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधला. शेवटी भाजपने आपल्या भूमिकेला तिलांजलि दिली. सरकार राक्षसी बहुमतात आहेत, भाजप कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी जीवाचं रान केले. त्यांना दुःखी ठेवत, इतरांना संधी दिली जात आहे. पालकमंत्रीपद आणि वेगवेगळी गणितांमध्येच महायुती सरकारचा वेळ जात असल्याचा टोला देखील अनिल परबांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.