Chandrakant Patil Meet Deepak Mankar: चंद्रकांतदादा- दीपकभाऊंच्या भेटीने पुण्यात उलथापालथी ; कोथरूडमध्ये मैत्रीचे नवे पर्व...

Pune NCP BJP Politics : अजितदादांचीच 'ताकद' मिळाल्याने मानकरांनीही पक्ष वाढविण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.
Pune NCP BJP Politics
Pune NCP BJP Politics Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: शिंदे-फडणवीसांना साथ देऊन सत्तेच्या तेही उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेल्या अजित पवारांमुळे पुण्यातील कोथरूडच्या राजकारणात उलथापालथी होऊ लागल्या आहेत. भाजपचे नेते, मंत्री, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांशी समझोता करीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकरांनी पुण्यात स्थानिक राजकारणातही नव्या घडामोडींचे संकेत दिले.

पाटलांच्या घरी जाऊन मानकरांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट औपचारिक असल्याचे दाखविले गेले; तरी चंद्रकांतदादा आणि दीपकभाऊंची जोडी कोथरूडच नव्हे; तर पुण्याच्या राजकारणातही 'दादागिरी' म्हणजे, आपापले पक्ष बळकट करून महापालिकेच्या राजकारणात पुन्हा 'ताकदवान' ठरू शकतात.

Pune NCP BJP Politics
Rohit Pawar Protest: न्याय मिळत नाही, तोपर्यंत हलणार नाही ; रोहित पवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना इशारा

आगामी निवडणुकीत बेरजेचे राजकारण साधणार..

पुण्याच्या राजकारणात रमलेल्या दादांनी वर्चस्व वाढवले असून, भाजपमधील बहुतांशी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना सत्ता आणि सत्तेबाहेर असतानाही 'बळ' दिले. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये मंत्री-पालकमंत्री झालेल्या दादांनी पुढच्या निवडणुकांची तयारी चालवली आहे. मात्र, कसबा विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे दादांची काहीशी पिछेहाट झाल्याचे बोलले गेले. त्यात महिना- सव्वा महिन्याआधीच्या महाविकास आघाडीचे पुण्यातही मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे होती. मात्र, आघाडीतील प्रमुख नेते, अजितदादांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्तेत वाटेकरी झाला. त्यानंतर अजितदादांनी पुण्याची जबाबदारी ज्येष्ठ नगरसेवक दीपक मानकरांकडे सोपवली.

Pune NCP BJP Politics
Pune Crime : ACP गायकवाड यांनी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या; स्वत:वरही गोळी झाडली..

सतेतही अजितदादांचीच 'ताकद' मिळाल्याने मानकरांनीही पक्ष वाढविण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांशी दोन हात करणारे मानकर आता सत्तेतील (भाजप-शिवसेना, शिंदे गट) जुळवून घेत आहेत. त्यातून मानकरांनी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण साधायचे असून, त्यातून पुण्यात अजितदादांची राजकीय 'बार्गेनिंग पॉवर' वाढविण्याचा मानकरांचा डाव आहे. त्यासाठी आतापासून चारही बाजुंनी डाव टाकणाऱ्या मानकरांनी भाजपच्या चंद्रकांतदादांसोबतची 'मैत्री' वाढवली आहे.

दादा-भाऊंच्या नव्या खेळीकडे पुणेकरांचे लक्ष..

सत्तेसाठी आजघडीला एकत्र असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाची पुढच्या निवडणुकांसाठी भूमिका ठरलेली नाही. मात्र, पुण्यात भाजपला राष्ट्रवादीची म्हणजे, अजितदादांचा भक्कम साथ राहू शकते. त्यामुळे सगळ्या निवडणुकांसाठी जिंकण्याची तयारी केलेल्या चंद्रकांतदादांसोबत अजिदादांच्या गटाचा राहील.

Pune NCP BJP Politics
Sanjay Shirsat on Ajitdada's CM: अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदावर शिरसाटांचा गर्भित इशारा; ‘त्यामुळे पवारांच्या अडचणीत वाढतील; पण मुख्यमंत्री...’

चंद्रकांतदादा हे पुन्हा कोथरूडमधून विधानसभेच्या रिंगणात उतरल्यास त्यांना मानकरांच्या स्थानिक वर्चस्वाचा फायदा होऊ शकतो. मात्र, पुढच्या विधानसभा निवडणुकीत मानकरही अजितदादा गटाकडून नशीब अजमावून शकतात. तेव्हा ते चंद्रकांतदादांची साथ घेणार हे अजमावून शकतात. तेव्हा ते चंद्रकांतदादांची साथ घेणार निश्चित आहे. शेवटी मानकरांना आमदार व्हायचे हे आजवर लपून राहिलेले नाही. त्यामुळे पुण्याच्या राजकारणात आता चंद्रकांतदादा-दीपकभाऊंच्या नव्या राजकीय खेळीकडे पुणेकरांचे लक्ष असेल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानकर-पाटील यांच्या भेटीने वातावरण बदलले आहे. यामुळे ठाकरे गटातील इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com