Uddhav Thackeray Press Conference: ठाकरे गटाचाही 'लाव रे तो व्हिडिओ; पुरावेच पुरावे देत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड

Uddhav Thackeray Maha Press Conference: शिवसेनेची जी घटनादुरुस्ती राहुल नार्वेकरांनी नाकारली, त्याच घटनादुरुस्तीच्या ठरावाला राहुल नार्वेकर उपस्थित होते.
Anil Parab
Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल नुकताच दिला.खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय देत शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवले. मात्र,राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने आता महापत्रकार परिषद घेत थेट शिवसेनेच्या कार्यकारिणीचे व्हिडिओच दाखवले आहेत. ठाकरे गटाच्या या पत्रकार परिषदेला 'जनता न्यायालय'असं नाव देण्यात आलं आहे.

शिवसेना पक्षाचा निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2013 आणि 2018 ची घटना नसल्याचं निरीक्षण नोदवत 1999 नंतर घटना नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सांगितले.2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही.

निवडणूक आयोगाकडे असलेली प्रत ही शिवसेनेची 1999 सालची घटना आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेलीच घटना ग्राह्य धरली जाईल. 2018 सालची घटना ग्राह्य धरा ही ठाकरे गटाची मागणी अमान्य करत विधानसभा अध्यक्षांनी खरी शिवसेना ही शिंदे यांची असल्याचा निर्णय दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anil Parab
Nanded Congress News : अशोक चव्हाण भाजपचा दावा खोटा ठरवणार की...?

आता याच मुद्यांवर ठाकरे गटाचे नेते अॅड.अनिल परब यांनी थेट 2013 ला शिवसेनेच्या कार्यकारणीत झालेले निर्णय वाचून दाखवले. याबरोबरच 2013 च्या कार्यकारणीत कोण-कोणते ठराव झाले, या कार्यकारिणीवेळी कोण-कोण उपस्थित होते, याचा थेट व्हिडिओच दाखवला. तर या व्हिडिओमध्ये आत्ता विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर हे 2013 ला शिवसेनेत होते.

एवढंच नाही तर शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या ठरावावेळी राहुल नार्वेकर हे तेथे स्वत:उपस्थित असल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, राहुल शेवाळे यांच्यासह आदी नेते त्यावेळी तेथे उपस्थित असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

अनिल परब नेमकं काय म्हणाले ?

'शिवसेनेच्या या प्रकरणाची जवळपास दीड वर्ष सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत होते. 16 गद्दार आमदार अपात्र होतील, असं संपूर्ण देशाला वाटलं होतं. आम्ही निकालाची चौकट बनवतो आणि त्या चौकटीच्या आधारावर अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असं न्यायालयानं सांगितलं होतं.

पण 1999 च्या नंतरची शिवसेनेच्या घटनेची नोंद नसल्याचे कारण देत हा निर्णय दिल्याचा नार्वेकरांनी सांगितलं, असं परब म्हणाले. मात्र, 2013 च्या शिवसेनेच्या कार्यकारणीत झालेले पाचही ठराव अनिल परब यांनी वाचून दाखवले. तसेच युवा सेनेला शिवसेनेची अधिकृत संघटना म्हणून मान्यता देण्यात आली होती. 2013 च्या घटना दुरुस्तीमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला होता, अशी माहितीही अनिल परबांनी दिली.

थेट पत्रच दाखवलं...

शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं. यानंतर शिवसेना पक्षाचा निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचाच असल्याचा निर्णय दिला. तसेच शिवसेनेच्या 2013 आणि 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नसल्याचा दावा करण्यात आला. आता अनिल परबांनी 3 मार्च 2013 ला निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या कार्यकारिणीत झालेल्या निर्णयाचा ठराव अर्थात घटनादुरुस्तीचे पत्र दिल्याचं थेट पत्रच पुरावा म्हणून दाखवलं.

या बरोबरच 2013 सालच्या निवडणूक प्रक्रियेचा व्हिडिओच दाखवण्यात आला. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड झाली असल्याचं दिसून येत आहे. 2013 च्या बैठकीतील उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडिओही दाखवण्यात आला आहे. तसेच बाळासाहेबांचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचा ठरावही झाल्याचाही व्हिडिओ दाखवण्यात आला. यासह आदी सर्व व्हिडिओ, पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग हे नाकारत आहे, एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या पत्रात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद असल्याचंही अनिल परब म्हणाले.

(Edited By- Ganesh Thombare)

Anil Parab
Jitendra Awhad : प्रभू श्रीरामांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com