Jitendra Awhad : प्रभू श्रीरामांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य; काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

Controversy once again about Lord Sri Rama : निवडणुकीपूर्वी रामाच्या नावाने वातावरणनिर्मितीचे भाजपचे नियोजन
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मागे प्रभू राम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून बराच वाद पेटला होता. तो शांत होतो ना होतो तोवर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांबद्दल आव्हाडांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. राम क्षत्रिय आहे, म्हणजेच तो बहुजन झाला आणि देशात बहुजनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राम आमचाच आहे. असं काही लोकांनी म्हणणं चुकीचं आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नवीन वाद सुरू केला आहे. याआधी त्यांनी प्रभू राम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं होतं. अभ्यासाशिवाय मी बोलत नाही, असं आव्हाड त्यावेळी म्हणाले होते.

Jitendra Awhad
Nilesh Lanke : राणी लंकेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेच्या सांगतेतून आमदार लंकेंचा दूरचं गणित जुळवण्याचा प्रयत्न!

हा वाद शांत झाला असता आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबाबत विधान केलं आहे. ते म्हणाले, प्रभू श्रीराम हे क्षत्रियच आहेत. त्यामुळे राम बहुजनच आहेत. राम क्षत्रिय आहेत. त्यांनी सांगावं, की राम क्षत्रिय नव्हता. राम क्षत्रिय आहे, म्हणजेच तो बहुजन झाला आणि देशात बहुजनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राम आमचाच आहे. असं काही लोकांनी म्हणणं चुकीचं आहे, असे आव्हाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले, आम्ही बहुजन आहोत. मी तेव्हा बोललो आम्ही मटण खातो. रामाबद्दलच्या माझ्या वक्तव्याबद्दल मी खेदही व्यक्त केला आहे. नंतर आजवर मी काहीच बोललो नाही. जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो, असं म्हणणार असाल तर देशातील 80 टक्के लोक शेणच खातात, तुमच्यातले अनेक लोक मटण खातात, म्हणजे ते शेण खातात.

शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल तर कधी कधी तुम्ही खाता मटण म्हणजे शेण. दरम्यान, भाजपवाल्यांचं कॅलेंडर हे वेगळं आहे. त्यांचे पंचांगही वेगळं आहे. आता तेच पंचांगकर्ते झाले आहेत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी रामाच्या नावाने वातावरणनिर्मितीचे नियोजन होते.

त्यामुळेच 22 जानेवारीची तारीख निवडली गेली. या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का ? रामाचा काही वेगळा दिवस आहे का ? काही नाही. वास्तू अपूर्ण असताना, त्यात प्राणप्रतिष्ठापना करू नये, असे शंकराचार्य सांगत असताना, त्यांना वेड्यात काढले जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

R...

Jitendra Awhad
Mumbai North East LokSabha Constituency : मुंबई उत्तर-पूर्वमधून मनोज कोटक यांच्यासमोर किरीट सोमय्यांचा अडसर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com