"ठाकरेंच्या सभेनंतर आज महाराष्ट्राचं आकाश भगवं होईल" : संजय राऊत

Shivsena chief Udhhav Thackeray Rally : शिवसेनेकडून सभेसाठी वातावरण निर्मीती
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama
Published on
Updated on

(Shivsena chief Udhhav Thackeray Rally)

मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मुंबईतील बीकेसी मैदानात जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ही सभा होणार आहे. कोरोनानंतरची ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मागच्या काही दिवसांपासून या सभेची जोरदार तयारी केली आहे. यावर बोलताना आज संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आजची सभा म्हणजे याआधीच्या १०० सभांपेक्षा वरचढ असेल, बाप असले.

संजय राऊत म्हणाले, 'आजच्या सभेचं व्यासपीठ पाहाल तर इतकं मोठं व्यासपीठ मुंबईत निर्माण झालं नव्हतं. भव्य असं व्यासपीठ आहे. शिवसेनेचा कारभार भव्यचं असतो. मैदानात उतरण्याच्या निश्चयाने आणि जिद्दीने या सभेचे आयोजन केले आहे. मागच्या काही काळापासून महाराष्ट्राचे, देशाचे राजकीय वातावरणावर आलेले मळभ, दुःख, गढूळपणा हे आजच्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल, या आकाशात भगवा धनुष्य दिसेल. पोटदुखी, जळजळवर देखील आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील. शिवसेना आणि गर्दी यांचं नातं आहे. समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही, असेही राऊत यांनी म्हटले.

Sanjay Raut Latest News
भंडारा जि.प. उपाध्यक्षांसह ३ सदस्य अडचणीत; अ‍ॅट्रॉसिटी अन् विनयभंगाचा गुन्हा दाखल

ते पुढे म्हणाले, मागच्या काही दिवसांपासून काही जण महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, काही जणं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याला आज उद्धव ठाकरे जाहीर सभेतून उत्तर देतील, करारा जवाब देतील. ऐतिहासिक आणि क्रांतीकारक अशी ही आजची सभा होईल. यावेळी राऊत यांनी केतकी चितळेवर देखील टीका केली. ते म्हणाले, काही व्यक्ती या हिमालयाएवढ्या असतात. सूर्यावर थुंकले तरी सूर्याचा महत्व कमी होत नाही. ही नशेबाज लोक आहेत, यांना एक वेगळ्या प्रकारची नशा घडवलेली आहे. यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात, पण खिडकी उघडली की ते हवेबरोबर वाहून जातील.

Sanjay Raut Latest News
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

दरम्यान शिवसेनेकडून आजच्या सभेसाठी जोरदार वातावरण निर्मीती करण्यात आली आहे. ट्विटरवरुन आजच्या सभेसाठी टिझर रिलीज करण्यात आला आहे. याशिवाय वृत्तपत्रामधून आम्हाला घरं जाळणारं हिंदुत्व नको, तर चूल पेटवणारं हिंदुत्व हवं, अशा आशयाच्या जाहिराती देण्यात आल्या आहेत. सोशल मिडीयावरुनही या सभेसाठी जोरदार वातावरण निर्मीती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com