Uddhav Thackeray: ठाकरेंच्या प्रचाराची तोफ 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात धडाडणार; स्टार प्रचारकही ठरले

Shivsena UBT Election Master Plan: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा मास्टर प्लॅन ठरला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

ShivsenaUBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा मास्टर प्लॅन ठरला आहे. शिवसेना पक्षफुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ठाकरेंनी ती अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. जागावाटपापासून ते प्रचारसभांपर्यंत अशा सर्वच पातळ्यांवर ठाकरेंनी स्वत: लक्ष घातल्याचं दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या 5 नोव्हेंबरपासून राज्यात सभांना सुरू होत आहे. येत्या 5 नोव्हेंबर रोजी ठाकरेंची पहिली रत्नागिरी येथे जाहीर सभा होत असून 17 नोव्हेंबर रोजी त्यांच्या मुंबईतील सभेने सांगताही होणार आहे. 16 नोव्हेंबर त्यांची मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ला समजल्या जात असलेल्या ठाण्यात सभा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या या काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये मविआच्या (Mahavikas Aaghadi) संयुक्त सभांचा देखील समावेश असणार आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि ठाकरेंच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या देखील सभा होणार

ठाकरेंच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत 24 स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,संजय राऊत सुषमा अंधारे, भास्कर जाधव, किरण माने, नितीन बानगुडे पाटील,ओमराजे निंबाळकर यांसह अनेक दिग्गज नेत्यांची फळी स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहे.

Uddhav Thackeray
Sada Sarvankar: राजसाहेब, माझ्यावर अन्याय करू नका! सदा सरवणकरांची भावनिक साद

स्टार प्रचारकांची यादी :

01. उद्धव ठाकरे

02. आदित्य ठाकरे

03. संजय राऊत

04. अरविंद सावंत

05. भास्कर जाधव

06. अनिल देसाई

07. विनायक राऊत

08. आदेश बांदेकर

09. अंबादास दानवे

10. नितीन बानुगडे पाटील

11. प्रियांका चतुर्वेदी

12. सचिन अहिर

13. सुषमा अंधारे

14. संजय (बंडू) जाधव

15. किशोरी पेडणेकर

16. ज्योती ठाकरे

17. संजना घाडी

18. जान्हवी सावंत

19. शरद कोळी

20. ओमराजे निंबाळकर

21. आनंद दुबे

22. किरण माने

23. प्रियांका जोशी

24. लक्ष्मण वडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com