Sanjay Raut : तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लवकरच मिळतोय; संजय राऊत यांचा मोठा दावा

Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांचा पक्ष फुटीवर असून, तिसरा उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार असल्याचा दावा केला.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkaranama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार, आमदार, माजी आमदार-खासदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश लवकर होणार असल्याचे जाहीर केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून लवकरच महाराष्ट्राला तिसरा मुख्यमंत्री मिळणार असल्याचा दावा केला आहे. संजय राऊत यांचा दावा करताना, तो तिसरा उपमुख्यमंत्री कोण, याचं नाव घेणं टाळलं.

खासदार संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनाप्रमुख नाही किंवा ते वारसदार नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोकं 'ईडी', 'सीबीआय'च्या भीतीने पळून गेलेले लोकं आहेत. जयचंद आहेत. देशाच्या शत्रूला किंवा महाराष्ट्राच्या शत्रूला मदत करत आहेत. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमच्याकडे भ्रष्ट मार्गाने मिळवलेला अमाप पैसा आहे. त्या पैशातून लोक, संस्था, मतदारांना विकत घेणं, त्यातून निवडणुका जिंकणं, याला राजकारण म्हणत असाल, तर अशा प्रकाराच्या राजकारणाला बाळासाहेबांनी वैश्याचं राजकारण म्हणायचं. तेच राजकारण एकनाथ शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर थुंकण्याचं काम करत आहे. हेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हवं आहे".

Sanjay Raut
Dinvishesh 24 January : काय घडलं होतं त्या वर्षी आजच्या दिवशी वाचा आजचे दिनविशेष

'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून एक समांतर शिवसेना अमित शाह (Amit Shah) नी निर्माण केली. पुराणांमध्ये सृष्टी आणि प्रतिसृष्टी होती. त्यात प्रतिसृष्टी टिकली नाही. शिर्डी आणि प्रतिशिर्डी आहे, पण प्रति शिर्डीला कोणी जात नाही. पंढरपूर आणि प्रति पंढरपूर आहे, पण लोकं पंढरपुरलाच जातात. विठोबा 'मातोश्री'वर एक आहे, अन् दुसरा पंढरपुराला आहे. बाकी कोणी देवळं बांधली असतील, ती गांभीर्यानं घेऊ नये. ती तात्पुरती आहे. एकनाथ शिंदे यांना गांभीर्याने घेऊ नये', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut
Top Ten News : बाळासाहेबांनी राज ऐवजी उद्धव ठाकरेंची निवड का केली? ; शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याला 'या' दोन बड्या नेत्यांनी ठरवून मारली दांडी ? - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

'एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सोडवावा, काल मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहे. उद्या तेही राहणार नाहीत. कारण तिसरा उपमुख्यमंत्री लवकरच महाराष्ट्राला मिळतो आहे. आणि तो त्यांच्याच पक्षातील आहे. त्याचा त्यांनी विचार करावा. ज्या घडामोडी पडद्यामागे सुरू आहेत. अमित शाह यांनी पंपांतून हवा भरल्यासारखे नेते आहे. हिंदूहृदयसम्राटांनी यांना खूप काही दिलं. तेव्हा त्यांना प्रतिष्ठा होती. आता काय आहे?', असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदेंच्या भाषणांकडे लक्ष देऊ नका...

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भाषणाकडे लक्ष देऊ नका, असे सांगून यांच्यासारखी आम्ही लाचारी पत्करली नाही. महाराष्ट्राच्या शत्रूशी लाचारी पत्करणं म्हणजे, अफलखानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे. महाराष्ट्राचे शत्रू आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे, म्हणजे इतिहास काळात औरंगजेब आणि अफलखानाच्या दरबारात मुजरे करण्याचं काम करत आहे, हे काम इमानानं करत राहावं. हा पैसा भ्रष्ट मार्गानं मिळवला आहे, ते तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळू देणार नाही. तुमची पद तात्पुरती आहे. तुमची पदं काढून घेतील अन् तुमच्यातील लोकं त्या पदावर बसवतील. तशा हालचाली दिल्लीत सुरू आहे', असा दावा देखील केला.

आमच्यातला गाळ केव्हाच निघून गेलाय...

'उदय सामंत यांना आव्हान आहे. जे पक्षप्रवेश करतील, ते आम्ही टीव्हीवर पाहू अन् त्यावर 'रिअ‍ॅक्शन' देऊ. तुमचे संभाळा अगोदर. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे. कोण जात आहे आणि कोण राहत आहे. माझ्याकडे जी माहिती आहे, ती कदाचित त्यांच्याकडे देखील नसेल. आमच्यातील सगळा गाळ गेला आहे. जे राहिले आहेत, ते राहणारच आहे. आमच्याबरोबर बाळासाहेबांच्या विचारांची लोकं आहे. शिंदेंनी एक नवीन विचार महाराष्ट्रात आणला आहे. पैसा फेको, तमाशा देखो. जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल, त्याला उखडून फेकून देऊ, आज नाही, उद्या. वेळ लागतो, एखाद्या गोष्टीला. भ्रष्टाचाराची मुळ उखडून फेकायला वेळ लागेल, पण ते होईल', असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com