
Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या डोंबिवलीतील पदाधिकारी व माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची डोंबिवली, कल्याण ग्रामीण व कळवा मुंब्रा विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी महापालिका निवडणूक पाहता शिवसेना ठाकरे पक्षाने या नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शिवसेना (Shivsena) ठाकरे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जिल्हाप्रमुखपदी दिपेश म्हात्रे व जिल्हा संघटकपदी तात्या माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर शिवसेनेची घट्ट बांधणी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे संघटन करण्यासाठी रखडलेल्या नियुक्त्या, रिक्त पदांवर पदाधिकारी नियुक्तीचे काम सुरू केले आहे.
दीपेश म्हात्रे कल्याण डोंबिवली पालिकेत नगरसेवक, युवासेना अध्यक्ष, स्थायी समितीचे सभापती होते. दोन वेळा त्यांनी डोंबिवली विधानसभेची निवडणूक भाजप (BJP) उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्याविरुध्द लढवली होती. आगरी समाजातील एक उमदा चेहरा डोंबिवली, कल्याण परिसरात हाती आल्याने ठाकरे पक्षा दीपेश म्हात्रे यांना तीन विधानसभांच्या प्रमुखपदी नियुक्त केले आहे.
कल्याण ग्रामीण, डोंबिवली, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात आगरी समाजासह विविध ज्ञाती समुहांना एकत्र आणून पालिकाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या समाज घटकांचे संघटन करण्याची मोठी जबाबदारी जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यावर असणार आहे.
दीपेश यांचे वडील माजी महापौर पुंडलिक म्हात्रे राजकारणात पूर्णवेळ सक्रिय असताना त्यांची डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागावर हुकमत होती. त्या स्नेहसंबंधाचा दीपेश म्हात्रे यांना कार्यकर्त्यांचे संघटन करताना उपयोग होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.