

Mumbai News : अर्थखातं अजित पवारांकडे देवू नये, असं शिवसेनेच्या आमदारांची मागणी होती. मात्र त्यांचा विरोध झुगारून अजित पवार यांनाच अर्थमंत्रीपद देण्यात आलं. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दिल्लीवारीनंतर रखडलेलं खातेवाटप जाहीर झाले. भाजप तसेच शिवसेनेच्या आमदारांकडील काही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आली. यावरून शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) खळबळजनक दावा केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, "अर्थ खातं जर अजित पवारांना द्यायचा नसेल तर अर्थखाते तुमच्याकडे घ्या अन् अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपद द्या, अशा प्रकारचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव पाहून मुख्यमंत्री शिंदे हे मागे फिरले, असा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच, अर्थ खातं अजित पवारांना दिलं गेलं. भाजप नेतृत्वाने शिंदे गटाचं काहीही एक ऐकलेलं नाही. सरकारमध्ये राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा, अशा शब्दांमध्ये दिल्लीतून मुख्यमंत्र्यांना आदेश दिला गेला, अशी माझ्याकडे पक्की माहिती आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
"शिंदे गटाला शेवटी अजित पवारांची धुणीभांडीच करावी लागेल. अजित पवार नको अशी त्यांची सुरूवातीची भूमिका होती. मात्र अजित पवारच सरकारमध्ये आल्याने शिंदेंचे आमदार टाळ्या वाजवण्याचे काम करत आहेत. टाळ्या वाजवायला लागणे हीच त्यांची लाचारी आहे," असे राऊत म्हणाले.
"अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्हाला कधीच मान्य नाही. त्यांचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेलाही पटलेले नाही. अजित पवांराच्या या निर्णयाने राज्याचेच नुकसान होणार आहे,' असेही संजय राऊत म्हणाले.
"सरकारमध्ये शिंदे गटाला काहीही महत्व नाही. शिंदे गट हा राज्याचा पक्ष नाही. भारतीय जनता पार्टीचे धोरण वापरा आणि फेकून द्या, असेच आहे. राज्यातल्या या दोन्ही गटाची अवस्था त्यापेक्षा वेगळे असणार नाही. राज्यातील या दोन्ही गटाची अवस्था त्यापेक्षा वेगळे असणार नाही," असेही संजय राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.