Ajit Pawar: अजितदादा, तुम्हीच सांगा, आम्ही जगावं की जीव सोडून द्यावा : सोलापूरच्या कांदा उत्पादकाने मांडली पवारांपुढे व्यथा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे.
Solapur Farmer Ravindra Chavan | Ajit Pawar
Solapur Farmer Ravindra Chavan | Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : सोलापुरातील एका ५१२ किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला २ रूपयांचा चेक मिळाला. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते कोणीही असो,अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आमच्याकडे त्याची व्यथा मांडली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, "आमच्याशी एका शेतकऱ्याने संपर्क साधला, सोलापुरातील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विकल्यानंतर या शेतकऱ्याला २ रूपयांचा चेक मिळाला. हे दुर्दैव आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही शोकांतिका आहे. राज्यकर्ते कोणीही असो,अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. कांदा निर्यात करण्यासाठी ताबडतोब पावले उचलायला हवी. यामुळे शेतकऱ्यांच्या कांदाला भाव मिळेल. आज मागणी आणि पुरवठा याचा ताळमेळ बसत नाहीये."

Solapur Farmer Ravindra Chavan | Ajit Pawar
Ajit Pawar : "शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत आयोगाचा निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना!"

काय म्हटलं आहे शेतकरी रवींद्र चव्हाणांनी?

याचवेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्याचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात कांदा उत्पादक शेतकरी रवींद्र चव्हाण यांनी ''या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला शेतकरी कसा जगायचा नी कसा वाचायचा, आता जीव सोडून द्यावा की काय कारावा, अशी भ्रांत आम्हाला पडल्याची भावना व्यक्त केली आहे.

सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारीला, 512 किलो कांदा विकला. किलोला १ रुपया दर देण्यात आला. ट्रान्सपोर्ट, हमाली, तोलाईचा खर्च वजा करुन व्यापाऱ्यानं 10 पोती कांद्याला, २ रुपयांचा चेक दिला. ही शेतकऱ्यांची स्थिती आहे. (सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं ४ क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्याला १ रुपयाही मिळाला नाही. उलट खिशातून ३१८ रुपये द्यावे लागले.

Solapur Farmer Ravindra Chavan | Ajit Pawar
MNS : मनसेला मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राज ठाकरेंना पत्र लिहित दिला तडकाफडकी राजीनामा

व्यापाऱ्यानं चेकही पंधरा दिवसांनंतरचा दिला आहे. आमचे वीज कनेक्शनही तोडायला लोक यायला लागते. त्याचं बील थकलयं. डीडीसी बॅंकेचं सहा-साडेसहा लाखांचं कर्ज थकलं आहे. या सर्वांत आम्ही कसं जगायचं. ही भ्रांत आम्हाला पडली आहे. की आता जीव सोडून द्यावा, आता जगल्यापेक्षा मेलेलं बरं, असं आम्हाला वाटू लागलं आहे. आता याला तुम्हीच न्याय करावा, अशी आमची तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. अशी व्यथा शेतकऱ्याने मांडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com