
Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल(बुधवार) पत्रकारपरिषद घेवून, आपण महायुतीच्या भावी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. एवढंच नाहीतर भाजप श्रेष्ठी मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घेतील, तो मला व शिवसेनाला मान्य असेल आणि आमचं त्यास समर्थनही असेल असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे आता महाराष्ट्राला भाजपचा मुख्यमंत्री मिळणार आणि त्यातही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील, असं जवळपास निश्चित झालेलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या निर्णयाचे भाजपकडूनही स्वागत करण्यात आले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही पत्रकारपरिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीरपणे कौतुक करत आभारही मानले. तर एकनाथ शिंदेच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमट असताना, त्यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांन मात्र त्यांचे वडील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. जे सध्यो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) पत्रात म्हणतात 'मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला 'सीएम' म्हणजे 'कॉमन मॅन' समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला. '
तसेच 'कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे.' असंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
याचबरोबर 'सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा!' असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.