Shrikant Shinde : गणपतशेठ, आव्हाड अन् पाटील हुकवणार श्रीकांत शिंदेंची 'हॅटट्रिक'?

Kalyan Lok Sabha Election 2024 : कल्याणमधून 2014 आणि 2019 असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.
Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Lok Sabha Political News : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर सर्व राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे उमेदवारीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरू आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यापुढील आव्हानेही वाढलेली आहेत. परिणामी राज्यासह देशाचेही कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे.

कल्याणमधून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) २०१४ आणि २०१९ असे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. ही त्यांची तिसरी निवडणूक असून, ते हॅटट्रिक करणार का, बदललेल्या राजकीय स्थितीत ते कशी आपली सीट राखणार, याकडे लक्ष लागले आहे. यातूनच यंदाची कल्याणची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या लोकसभाअंतर्गत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्र-कळवा हे विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
NCP Breaking News : शरद पवारांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला 'हे' महत्त्वाचे आदेश

अंबरनाथ येथे आमदार बालाजी किणीकर (Balaji kinikar) यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत चांगले संबंध आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत ते त्यांना मदत करतील असे चित्र आहे. उल्हासनगर येथे भाजपचे आमदार कुमार आयलानी (Kumar Ailani) आहेत, तर येथील राजकारणात कलानी कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. साधारण 40 हजार मते कलानी कुटुंबाची आहेत. कलानी कुटुंब खासदारकीच्या निवडणुकीत शिंदेंना मदत करणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले, तर भाजप आणि शिंदे गटाची महायुती असल्याने आमदार आयलानीही शिंदेंना मदत करत आहेत.

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
Bajrang Sonwane : प्रीतम मुंडेंविरोधात निवडणूक लढवणाऱ्या सोनवणेंच्या मनात चाललंय काय?

कल्याण पूर्व विधानसभेत गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) भाजपकडून आमदार आहेत. मात्र, आमदार गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. तसेच गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंवर गंभीर आरोपही केलेले आहेत. त्यानंतर कल्याण पूर्वमध्ये शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा आहे. परिणामी येथून खासदार शिंदेंना मतदारांपर्यंत पोहाेचणे आव्हानात्मत आहे.

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
Naresh Mhaske News : 'बालिश चाळे सोडा अन् आहे तो पक्ष तरी...' ; नरेश म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला!

डोंबिवली विधानसभेचे आमदार आणि सार्वजनिकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे खासदार शिंदे यांना मदत करणार आहेत. आरएसएसची मते अधिक असून, भाजपबहुल मतदारसंघ आहे. याशिवाय खासदार शिंदे यांचीदेखील येथे पकड घट्ट असल्याचे पाहायला मिळते. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार मनसेचे राजू पाटील आणि शिंदे यांच्यामध्ये फारसे सख्ख्य नाही. मात्र, मनसेने भाजपबरोबर हात मिळवणी केली तर राजू पाटलांना खासदार श्रीकांत शिंदेंना मदत करण्याशिवाय पर्याय नसणार, हे मात्र नक्की.

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
NCP News : शरद पवारांच्या आमदाराने घेतली अजितदादांच्या मोठ्या नेत्याची भेट; काय आहे कारण..?

मुंब्रा कळवा विधानसभेत सध्या राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आमदार आहेत. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात त्यांची पकड पक्की आहे. त्यामुळे ते खासदार श्रीकांत शिंदे यांना मदत करणार नाहीत. त्यामुळे या पट्ट्यातील मते मिळवणे श्रीकांत शिंदे यांना जिकिरीचे ठरणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील या बदललेल्या राजकीय गणितामुळे खासदार शिंदेंना या वेळी जास्त कष्ट घ्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री शिंदेंसह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट असणार आहे.

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'स्वाभिमानी'च्या नव्या घोषणेने राजकीय गणितं बिघडणार ?

कल्याण लोकसभेच्या निवडणुकीची गणिते

2009 ची निवडणूक

कल्याण लोकसभेत 2009 मध्ये शिवसेनेचे आनंद परांजपे निवडून आले होते. या वेळी त्यांना दोन लाख 12 हजार 476 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरेंना एक लाख 78 हजार 274 मते पडली होती. याच निवडणुकीत मनसेच्या वैशाली दरेकरांना एक लाख दोन हजार 63 मते मिळाली होती.

2014 ची निवडणूक

या निवडणुकीत खासदार प्रथमच श्रीकांत शिंदे निवडून आले होते. त्यांना चार लाख 40 हजार 892 मते मिळाली होती. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना एक लाख 90 हजार 143 मते मिळाली होती.

2019 ची निवडणूक

शिवसेना पक्षाकडून उभ्या असलेल्या श्रीकांत शिंदे यांना पाच लाख 58 हजार 23 मते मिळाली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील होते. त्यांना सव्वा लाखाहून अधिक मते मिळालेली होती. त्यावेळी शिंदेंनी तब्बल तीन लाख ४३ हजार मतांनी बाजी मारली. दरम्यान, कल्याणमध्ये 2019 च्या निवडणुकीत एकूण 19 लाख 65 हजार 130 मतदारांपैकी आठ लाख 89 हजार 809 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

(Edited by Sunil Dhumal)

R

Shrikant Shinde, Raju Patil, Jitendra Awhad, Ganpat Gaikwad
Atul Londhe Congress : नितेश राणेंची चिथावणीखोर भाषा भाजप अन् फडणवीसांना मान्य आहे का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com