Lok Sabha Election BJP MNS Alliance: भाजप आणि शिवसेना BJP-Shiv Sena शिंदे गटात कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. तरीही त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या जागेबाबत अद्याप महायुतीचे एकमत झाल्याचं दिसत नाही.
एकीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असतानाच आता मनसेला MNS हा मतदारसंघ देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा मतदारसंघ आमदार राजू पाटील Raju Patil यांच्यासाठी सोडायची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्याचा दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे आता यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे Raj Thackeray काय बोलणार? याबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच या मेसेजमुळे पाडव्याला राज ठाकरे मुहूर्त साधणार का? अशी चर्चा रंगली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी Kalyan Lok Sabha Constituency शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, महायुतीने इथला उमेदवार जाहीर केला नाही. शिवाय भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जरी शिंदे यांना मदत करण्याचे जाहीर करत असले, तरी स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते भाजपच्या बैठकांना गैरहजर राहून आपली नाराजी जाहीर करत आहेत. तसेच कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण मतदारसंघात भाजपकडून शिवसेनेला (Shivsena) उघड विरोध केला जात आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाहांची Amit shaha भेट घेतली. या भेटीनंतर मनसे महायुतीसोबत येणार असून, राज यांनी दोन जागांवर दावा केल्याचं बोललं जात आहे. मात्र, त्यानंतर मनसेने (MNS) काहीच उघड न केल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे. अशातच आता मनसेच्या वतीने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, '9 एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचं आहे!' त्यामुळे यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे Raj Thackeray काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
तर मनसेच्या MNS वतीने आणखीन एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे, "कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांना मोठा झटका. कल्याण लोकसभा मतदारसंघ मनसेच्या राजू पाटील यांना सोडायची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे आता ठाण्यातून लढणार आहेत. मनसेचा हट्ट, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधाचा विचार करून भाजप पक्षश्रेष्ठींना शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांना मनवण्यात यश आले आहे.
त्यामुळे आता कल्याणात उबाठा गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे व मनसेच्या राजू पाटलांमध्ये थेट लढत होणार अशी शक्यता आहे. येणाऱ्या एक दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल," असा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे मनसेच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय कल्याण लोकसभेवर मनसेच्या इंजिनला थांबा मिळणार का ? पाडव्याला राज ठाकरे नक्की काय सांगणार, खरंच ते युतीत जाणार का, मनसेच्या उमेदवारांची राज ठाकरे घोषणा करणार का? अशा अनेक चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
(Edited By Jagdish Patil)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.