Uddhav Thackeray Shiv Sena candidate list: ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; वैशाली दरेकर, सत्यजित पाटलांना उमेदवारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
Shiv Sena, Uddhav Thackeray
Shiv Sena, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 News : लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामडी, जळगावमधून करण पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Shiv Sena, Uddhav Thackeray
Loksabha Election 2024 : ठाकरेंच्या मशालीने केली शेट्टींची गोची; स्वाभिमानीच्या अस्तित्वाचा प्रश्न...

हातकणंगलेमधून ठाकरे गट राजू शेट्टी यांना पाठिंबा देईल, अशी चर्चा होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी येथून सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. संजय राऊत म्हणाले, आम्ही राजू शेट्टी (Raju Shetti ) यांना महाविकास आघाडीत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ते त्यांनी स्वीकारले नाही. आम्ही त्यांना त्यांनी मशाल चिन्हावर लढावे, असे सांगतले होते. मात्र, त्यांनी त्यावर असमर्थता दर्शवली. त्यामुळे आम्ही या जागेवर उमेदवार जाहीर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जळगावचे विद्यमान खासदान उन्मेष पाटील यांनी आज शिवसेनेमध्ये (ठाकरे गट) प्रवेश केला. त्यांना जळगावमधून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांना जळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com